Covid-19 : खासगी रूग्णालयातील लसीकरणाचे दर निश्चित

भारतात 1 मार्चपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे.  

Updated: Feb 28, 2021, 08:05 AM IST
Covid-19 : खासगी रूग्णालयातील लसीकरणाचे दर निश्चित title=

मुंबई : गेल्या वर्षी संपूर्ण जगात हाहाःकार मजवणाऱ्या कोरोना व्हायरसने आतपर्यंत लाखो लोकांचे प्राण घेतले. या धोकादायक विषाणूवर मात करण्यासाठी अनेक देशांनी लस शोधली आहे. शिवाय लसीकरणाला सुरूवात देखील झाली आहे. भारतात 1 मार्चपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. आता कोरोनावर मात करणारी लस खासगी रूग्णालयात देखील उपलब्ध असणार आहे. खासगी रूग्णालयातील लसींचे दर देखील निश्चित करण्यात आले आहेत. खासगी रूग्णालयात लसीकरण मोहीम सुरू केल्यामुळे लसीकरण प्रक्रिया लवकर पूर्ण होणार आहे. 

1 मार्चपासून खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण सुरू होणार आहे. एका डोससाठी जास्तीत जास्त 250 रुपये मोजावे लागणार आहेत. १ मार्च पासून सरकारी रूग्णालयामध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे. तसंच ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि ज्यांना आधीपासूनच काही आजार आहेत, अशा लोकांना लस मोफत दिली जाणार आहे. पण खासगी रूग्णालयामध्ये लस घ्यायची असल्यास २५० रुपये द्यावे लागणार आहेत. 

दरम्यान, लसीकरणाच्य पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी यांना लस देण्यात आली. पहिले दोन टप्पे झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात सोमवारपासून वृद्ध तसेच सहआजाराच्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आता लस सरकारी आणि खासगी रूग्णालयांमध्ये उपलद्ध असणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून देशात त्याचप्रमाणे राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी राज्यात राज्यात कोरोनाच्या 8623 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे 51 जणांनी आपला जीव गमावला.