राज्यसभेत विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचे निलंबन, ही लोकशाहीची हत्या - प्रियंका चतुर्वेदी

Priyanka Chaturvedi On suspension​ : राज्यसभेत विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचे निलंब करण्यात आले आहे. 

Updated: Nov 30, 2021, 11:20 AM IST
राज्यसभेत विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचे निलंबन, ही लोकशाहीची हत्या - प्रियंका चतुर्वेदी title=
Pic Courtesy: DNA

नवी दिल्ली : Priyanka Chaturvedi On suspension : राज्यसभेत विरोधी पक्षांच्या 12 खासदारांचे निलंब करण्यात आले आहे. दरम्यान, विरोधकांना बोलू न देणे आणि आमचे म्हणणे ऐकून घेणे, ही लोकशाहीची हत्या, अशी संतप्त प्रतिक्रिया निलंबित शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे. (Priyanka Chaturvedi upset over suspension from Rajya Sabha)

राज्यसभेतून निलंबित करण्यात आल्यावर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेतील निलंबनावर नाराज प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, ही लोकशाहीची हत्या आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. करण्यात आलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देण्याची संधीही देण्यात आली नाही आणि त्यांना निलंबित करण्यात आले. मी सरकारला आव्हान देते की त्यांनी राज्यसभेतून एकच कॉल केला आहे हे सिद्ध करावे. ही लोकशाहीची हत्या आहे. आपल्याकडे आरोपीलाही बाजू मांडायची संधी दिली जाते, आम्हाला तीही देण्यात आली नाही, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. 

राज्यसभेतून निलंबित खासदारांवर संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या 12 खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, टीएमसी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, तर सीपीएम आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन आणि इतर अनेक मुद्द्यांवरून राज्यसभेत या 12 खासदारांनी गोंधळ घातला, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान या खासदारांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर कागदपत्रे फेकली आणि सभागृहातील कर्मचाऱ्यांसमोर ठेवलेल्या टेबलावर उभे राहिले. या 12 गोंधळी खासदारांवर कारवाई करण्याची मागणी होत होती.

निलंबनाची कठोर कारवाई केली गेली त्यात काँग्रेसच्या सहा खासदारांचा समावेश आहे. फुल्लो देवी नेताम, छाया वर्मा, आर. बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन आणि अखिलेश प्रताप सिंग या काँग्रेस खासदारांना निलंबित करण्यात आले. तसेच बिनॉय विश्वम, डोला सेन आणि शांता छेत्री, शिवसेनेचे प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांना निलंबित करण्यात आले आहे.