एयरपोर्टवर प्रियंका आणि राहुल गांधींची अचानक भेट, व्हिडिओ व्हायरल

राहुल आणि प्रियंका गांधींचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

Updated: Apr 27, 2019, 04:30 PM IST
एयरपोर्टवर प्रियंका आणि राहुल गांधींची अचानक भेट, व्हिडिओ व्हायरल

कानपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासोबत कानपूर एयरपोर्टवर अचानक भेट झाली. या भेटीचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राहुल आणि प्रियंका यांच्यातील असलेलं बहिण-भावाचं प्रेम हे या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. हा व्हिडिओ राहुल गांधी यांनी स्वत: आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. दोघेही अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. दोघांची उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी सभा होती. पण सभेच्या ठिकाणी जाण्यापूर्वी दोघांची अचानक भेट झाली.

राहुल गांधी या व्हिडिओमध्ये बोलत आहेत की, 'मी तुम्हाला सांगतो की, चांगला भाऊ असणं काय असतं? खूप लांब-लांब दौऱ्यासाठी जात आहे आणि एका छोट्या हॅलिकॉप्टरने. माझी बहिण छोट्या प्रवासासाठी मोठं हॅलिकॉप्टरने जाते. पण तुम्हाला माहित आहे की, माझं बहिणीवर खूप प्रेम आहे.' राहुल गांधी जेव्हा हे बोलत होते तेव्हा प्रियंका गांधी त्यांचं हे बोलणं ऐकूण हसत होत्या. प्रियंका गांधी यांनी भावाची गळाभेट घेत राहुल गांधी यांना बाय देखील म्हटलं.