Property Tips: घर खरेदी करताय! 'या' चुका अजिबात करू नका

Property Tips for Buyers: घर खरेदी करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यायला हवी? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: Oct 6, 2022, 04:17 PM IST
Property Tips: घर खरेदी करताय! 'या' चुका अजिबात करू नका title=

Investment in Property: आयुष्यात स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आयुष्यभर मेहनत केल्यानंतर लोक विकत घेतात. काहीजण घर खरेदीच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. पण, घर खरेदी करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यायला हवी याबद्दलची माहिती जाणून घेऊया...

प्रॉपर्टीबद्दलची माहिती

तुम्ही खरेदी करत असलेल्या घराबद्दलची सविस्तर माहिती करुन घ्यायला हवी. विकत घेत असलेली प्रॉपर्टी गैरव्यवहारात तर नाही ना? याविषयी खात्री करुन घ्या. घराचं पजेशन निश्चित वेळी मिळणार की नाही, या बद्दलची देखील माहिती मिळवा.

रेरामध्ये करा तक्रार

प्रॉपर्टी संदर्भात कसलीही तक्रार असल्यास रेरामध्ये म्हणजेच RERA (रियल एस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी)  तक्रार नोंदवली जाऊ शकते. रेरामध्ये प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन केल्याने बिल्डरला प्रोजेक्ट संदर्भात दिलेल्या  सर्व घोषणांची पूर्तता करावी लागतं. प्रोजेक्ट संदर्भात बिल्डरने केलेल्या घोषणांची पूर्तता करत नसेल किंवा प्रोजेक्ट संदर्भात काही घोटाळा केला असेल तर तुम्ही बिल्डरविरोधात रेरामध्ये तक्रार करता येते.    

रिफंड बद्दलची माहिती

रेरामध्ये तक्रार करुन देखील तुम्ही संतुष्ट नसाल तर तुम्ही बिल्डर विरोधात कोर्टात अपील करु शकता. निश्चित वेळेत घराचं पजेशन न मिळणारे देखील रेरामध्ये तक्रार नोंदवून पैसै रिफंड संदर्भात मागणी करु शकतात. 

वेबसाइट वाचा

प्रत्येक बिल्डरला आपल्या संपत्तीची संपूर्ण माहिती रेराच्या वेबसाईटवर भरावी लागते. घर खरेदी करताना तुम्ही रेराच्या वेबसाइटवरील प्रोजेक्ट आणि बिल्डरबद्दलची सर्व माहिती वाचून तुमच्या शंका दूर करु शकता.