नवी दिल्ली : शुक्रवारी दुपारी सिंधू सीमेवर पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाला. तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची मागणी आंदोलक करत होतो. स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकर्यांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. सिंधू सीमेवर स्थानिक लोकं आणि आंदोलनकर्त्यांमध्ये दगडफेक झाल्याने पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले.
त्याच वेळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. दगडफेकीत पोलिसांसह अनेक लोकं जखमी झाले आहेत. या क्षणी येथील वातावरण खूप तणावपूर्ण आहे. असे सांगितले जात आहे की 2 महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.
येथे उपस्थित प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सिंधू सीमेवरील आंदोलकांना तेथून हटवण्याच्या निषेधार्थ सीमेच्या आसपासच्या खेड्यांमधील लोकं आणि आंदोलनकर्ते एकमेकांशी भांडले. त्यानंतर गोष्टी आणखी बिघडू लागल्या. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. त्याच वेळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. आंदोलन करणार्यांमध्ये काही उपद्रवी लोकं तलवारीसह पोहचले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Delhi: Alipur SHO Pradeep Paliwal injured in a clash that broke out at Singhu border where farmers are protesting against #FarmLaws
(Pic source: Delhi Police) pic.twitter.com/cfyB9dN45Q
— ANI (@ANI) January 29, 2021
अलिपूर एसएचओवर तलवारीने हल्ला
सिंधू सीमेवर झालेल्या गदारोळाच्या वेळी अलिपूर पोलीस ठाण्यात तैनात एसएचओवर तलवारीने हल्ला करण्यात आला. यात त्याच्या हातावर तलवारीचा वार लागला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की, 2 महिन्यांहून अधिक काळ अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या निदर्शनांमुळे केवळ व्यवसायावर परिणाम झाला नाही तर शेकडो लोकं बेरोजगार झाले आहेत.
दिल्ली बॉर्डर पोलिसांनी सील केली आहे. जवळपासची दुकानेही बंद करण्यात आली आहेत, त्यामुळे सिंधू आणि आजुबाजुच्या परिसरातील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ग्रामस्थांचे नेतृत्व करणारे, दिल्ली देहात विकास मंचचे सरचिटणीस अनूपसिंग मान म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यात घुसून देशाच्या प्रतिष्ठेला डाग लावणाऱ्या लोकांनी गेल्या दोन महिन्यांपासून सिंधू सीमा बंद केली आहे. अशा परिस्थितीत रहदारी थांबल्यामुळे त्यांना ओलीस ठेवलेले आहे.
#WATCH: Delhi Police hit a protesting farmer after he attacked a Police personnel, dragging him to the ground along with him. Visuals from Singhu border.
(Note: Abusive language) pic.twitter.com/gILDF9OPA1
— ANI (@ANI) January 29, 2021
ग्रामस्थांना रोज अनेक समस्या भेडसावत आहेत. लोक रुग्णालयात जाऊ शकत नाहीत. महिला घराबाहेर पडू शकत नाहीत. लोकं नातेवाईकांना भेटायला असमर्थ आहेत. लोकांना घर सोडल्यास त्यांच्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. लोकांना लांबपर्यंत चालत जावं लागतं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या घटनेनंतर गावातील लोकांचा रोष दिसून येत आहे. नागरिकांना कोणताही दोष नसताना त्रास सहन करावा लागत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.