XPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम; Black Holes चं गूढ उलगडणार

PSLV-C58 XPoSat Mission ISRO: खगोलीय स्त्रोतांकडून होणाऱ्या एक्स रे उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा 'इस्रो'चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 1, 2024, 09:49 AM IST
XPoSat चं यशस्वी लॉन्चिंग! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO चा पराक्रम; Black Holes चं गूढ उलगडणार title=
सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी झालं लॉन्चिंग

PSLV-C58 XPoSat Mission ISRO: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इतिहास घडवला आहे. श्रीहरिकोटामधील प्रक्षेपण केंद्रावरुन इस्रोने 'एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा'चं प्रक्षेपण केलं आहे. एस्पोसॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपग्रहाचं सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ध्रवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) - सी 58 च्या मदतीने अंतराळामध्ये लॉन्चींग करण्यात आलं. अवकाशातील ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास या मोहिमेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या महिमेचा कालावधी 5 वर्षांचा असणार आहे.

काय करणार हा उपग्रह?

ब्लॅक होल कसे तयार होतात हे उकलण्याचा प्रयत्न एस्पोसॅटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही भारताची पहिली समर्पित 'पोलरिमीटर' मोहीम आहे. यामधून मिळणारा डेटा ब्लॅक होलसंदर्भातील अनेक रहस्य उलगडणार आहे. ध्रवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) - सी 58 ने आपल्या 60 व्या मोहिमेत प्रमुख अब्यास उपग्रह 'एक्सपोसॅट'सहीत 10 उपग्रहांना प्रक्षेपित केलं आहे. हे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत सोडले जाणार आहेत. 'इस्रो'च्या मते अवकाश आधारित ध्रुवीकरण मापनांद्वारे खगोलीय स्त्रोतांकडून होणाऱ्या एक्स रे उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा 'इस्रो'चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे. पाहा या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा व्हिडीओ...

1)

2

मोहिमेची वैशिष्ट्ये काय?

> ब्लॅक होलची खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलणयाचा प्रयत्न

> उपग्रह प्रक्षेपक प्रमुख अब्यास उपग्रह 'एक्सपोसॅट'सहीत 10 उपलब्ध प्रक्षेपित करणार

> खगोलीय स्रोतांकडून होणाऱ्या एक्स रे उत्सरज्नाचा अभ्यास करणारा हा इस्रोचा पहिला समर्पित वैऊानिक अभ्यास उपग्रह