मुंबई : रवीवार, सोमवार त्यानंतर मंगळवारी देखील बँका बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आज एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे हाल होणार आहेत. सलग तीन दिवस बँका बंद असल्यामुळे एटीएम मधून पैसे काढणे कदाचीत कठीण होणार आहे. सहा सार्वजनिक बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला.
केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आजचा संप पुकारण्यात आला आहे. ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ आणि ‘बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया’ने मंगळवारच्या संपाची हाक दिली. संबंधतीत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी संपामध्ये सामिल झाले आहेत.
या देशव्यापी संपाची पूर्व सूचना बँकांच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना दिली होती.
काय आहेत संपा मागचे मुख्य मुद्दे:
- सरकार कडून गेल्या काही दिवसांमध्ये सहा पब्लिक सेक्टर बँकांचे चार मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे. बँक कर्मचाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला.
- यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बँकांचे विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत करण्यात आले आहे.
- सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण कॅनरा बँकेत करण्यात आले आहे.
- इलाहाबाद आणि इंडियन बँकेचं देखील विलिनीकरण करण्यात आलं होतं.
- आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलिनीकरण यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं आहे.
- बँकांचं विलीनीकरण, बँकिंग सुधारण, सेवा शुल्क, बॅड लोन रिकव्हरी, डिफॉल्टर्सविरूद्ध कडक कारवाई इत्यादी संदर्भात बँका संपावर आहेत.
- बँक ऑफ महाराष्ट्र, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, सिंडिकेट बँक आणि बँक ऑफ बडौदा या बँकां कडून असं सांगण्यात येत आहे की, कामकाज व्यवस्थित नाही.
- खाजगी बँका या संपामध्ये सामिल नाहीत, त्यामुळे खाजगी बँकांचे कामकाज सुरळीत सुरू असणार आहे.