हातात नंग्या तलवारी घेऊन पोलिस स्टेशनवरच हल्ला! शिवसेना नेत्याच्या हत्येशी कानेक्शन

Punjab Police Station Under Attack: आधी या लोकांनी पोलीस स्टेशन परिसरामध्ये मोठ्या संख्येनं गर्दी केली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनवर एकाच वेळी सर्व बाजूंनी हल्ला केला.

Updated: Feb 23, 2023, 05:02 PM IST
हातात नंग्या तलवारी घेऊन पोलिस स्टेशनवरच हल्ला! शिवसेना नेत्याच्या हत्येशी कानेक्शन title=
Punjab Police Station Attack

Punjab Police Station Attack: पंजाबमधील अमृतसरमध्ये 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगच्या (Amritpal Singh) समर्थकांनी अजनाला पोलीस स्टेशनवर हल्ला केला. अजनाला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गोळा झालेल्या अमृतपाल सिंगच्या समर्थकांनी तलवारी आणि बंदुका हातात घेऊन पोलिसांनी प्रवेशबंदीसाठी ठेवलेले बॅरिकेड्स तोडले. समर्थकांनी अमृतपाल सिंगचा निकटवर्तीय लवप्रीत तूफानच्या अटकेविरोधात पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता. याच मोर्चाला नंतर हिंसक वळण लाभलं.

शिवसेना नेत्याच्या हत्याकांडामध्ये नाव

अमृतपाल सिंगचं नाव पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सूरी हत्याकांड प्रकरणामध्ये समोर आलं होतं. सुधीर सूरी यांच्या कुटुंबियांनी हत्याकांड प्रकरणामध्ये अमृतपाल सिंगच्या नावाचाही समावेश करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख असलेल्या अमृतपाल सिंगला मोगा येथील सिंगावाला गावामध्ये नजरकैद केलं आहे. अमृतपाल सिंग जालंदरमधील विशाल नगरला किर्तनासाठी रावाना होणार होता. तेव्हाच पोलिसांनी गुरुद्वारेजवळ अमृतपालला नजरकैद केलं.

फूटीरतावादी संदीप सिंग

सुधीर सूरी यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी काही वेळामध्येच हल्लेखोर संदीप सिंगला अटक केली होती. संदीप सिंगची कारही पोलिसांनी जप्त केली होती. आरोपीच्या कारमध्ये खलिस्तान्यांचं पोस्टर लावण्यात आल्याचं पोलिसांना आढळून आलं. याशिवाय संदीपच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील त्याच्या हल्लीच्या पोस्टवरुन तो कट्टर फुटीरतावादी असल्याचं स्पष्ट झालं. संदीपने आपल्या अकाऊंटवर अमृतपाल सिंगचे अनेक व्हिडीओ पोस्ट केले होते. यामध्ये खलिस्तान समर्थक अमृतपालच्या मुलाखतीचाही एक व्हिडीओ होता.

अभिनेत्याने सुरु केली संघटना

अमृतपाल जरनैल सिंग भिंडरावालेचा समर्थक आहे. अमृतपाल हा खलिस्तान समर्थक मानला जातो. सप्टेंबरमध्ये अमृतपाला संघटनेचं प्रमुख म्हणून जाहीर करण्यात आलं. 'वारिस पंजाब दे' संघटनेची स्थापना अभिनेता संदीप सिंग उर्फ दीप सिद्धीने केली. दीप सिद्धू हा 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या आंदोलनामधील प्रमुख आरोपी होता.