ज्याला समजले भिकारी, तो तर निघाला करोडपती

रस्त्यावर जेवणासाठी भटकणारा भिकारीकडे निघाले एवढे पैसे..... 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 22, 2017, 12:22 PM IST
 ज्याला समजले भिकारी, तो तर निघाला करोडपती  title=

मुंबई : रस्त्यावर जेवणासाठी भटकणारा भिकारीकडे निघाले एवढे पैसे..... 

भिक मागत असल्यामुळे त्याला आंघोळ घालून त्याला जेवू घातला. आणि नंतर कळलं की आपण ज्या भिकाऱ्याला जेवण देत आहोत तो तर कर्नाटकचा करोडपती निघाला. त्याच्याकडे आधार कार्ड आणि जवळपास 1 करोड रुपयांचे एफडी कागद मिळाले. कुटुंबातील कलह आणि कामाच्या ताणामुळे दयनीय अवस्थेत असलेल्या या भिकाऱ्याला त्याच्या मुलीकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर त्या मुलीने सांगितले की तिचे वडिल गेले सहा महिने हरवले आहेत. ते ट्रेनमधून तीर्थयात्रेसाठी निघाले होते पण तिथेच ते हरवले असल्याची माहिती मिळाली. 

कोण होती ती व्यक्ती?

माहिती मिळाल्यानुसार, रायबरेली रालपुर येथे असलेल्या स्वामी सूर्य प्रबोध परमहंस इंटर कॉलेज अनगपुरममध्ये 13 सप्टेंबरला एक म्हातारी व्यक्ती भूकेने व्याकूळ झालेली आली होती. शाळेचे संस्थापक स्वामी भास्कर स्वरूप यांनी त्या भिकाऱ्याला जेवण दिलं. जेवण दिल्यानंतर त्यांना स्वच्छ आंघोळ घालून स्वच्छ केलं. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे केस कापले. नवीन कपडे घालायला दिले. जेव्हा त्या भिकारीच्या कपड्यांची साफसफाई केली जात होती तेव्हा त्या कपड्यात आधार कार्ड आणि एफडीचे काही कागदपत्र मिळाले. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या एफडींच्या किंमती या 1 करोड ते 7 लाख रुपये इतकी आहे. याची माहिती स्वामीजींनी देताच आधार कार्डाद्वारे त्या भिकारीची ओळख पटवून घेण्यास मदत झाली ही व्यक्ती तामिळनाडूच्या थिरूवनावलीचे ते निवासी असून त्यांची ओळख मुथैया नादर अशी ओळख मिळाली. 

आधार कार्डावर असलेल्या नंबरवर त्या भिकारीच्या कुटुंबियांना फोन करण्यात आला. माहिती मिळताच तामिळनाडूवरून त्यांच्या नातेवाईकांनी धाव घेतली. त्यांनी सांगितलं की जुलै महिन्यात मुथैया हे तीर्थ यात्रेला निघाले होते. तेव्हापासून ते हरवले आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ते चोरांच्या हाती लागले असतील. नातेवाईकांनी स्वामीजींचे आभार मानून त्या मुथैया गृहस्थाला घरी घेऊन गेले.