'एनडीएमध्ये भाजप एकटाच पक्ष उरणार'

पाहा भाजपवर कोणी केली ही भविष्यवाणी

Updated: Jul 16, 2018, 01:00 PM IST
'एनडीएमध्ये भाजप एकटाच पक्ष उरणार' title=

पटना: विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलने दावा केला आहे की, बिहारमध्ये सत्तेत असणाऱ्या एनडीएमध्ये लवकरच खळबळ उडणार आहे. अनेक आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी असा दावा केला आहे. अमित शाह यांच्या बिहार दौऱ्यानंतर भाजप आणि जेडीयूमध्ये जागावाटपासा तिढा सूटला असल्याचा दावा देखाल खोटा असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, ''एनडीएमध्ये लवकरच खळबळ उडणार आहे. एनडीएमध्ये फक्त भाजप एकटाच पक्ष उरणार आहे. शिवसेना देखील नाराज आहे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू देखील एनडीएमधून बाहेर पडले आहेत. अशीच गोष्ट बिहारमध्ये देखील होऊ शकते.''

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये सत्तेत असलेल्य़ा भाजप आणि जेडीयूच्या प्रमुखांमध्ये बैठक झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा आणि नीतीश कुमार यांच्यात झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत जागा वाटपाचा फॉर्म्यूला देखील ठरल्याचा दावा केला जात आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी देखील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र मिळून काम करण्याचं आवाहन केलं आहे.

गुरुवारी पटनामध्ये अमित शाह यांनी म्हटलं की, राजद नेहमीच बिहारमध्ये मजबूत आहे. नीतीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी झाले.

लोजपा आणि रालोसपावर सगळ्यांचं लक्ष

अमित शाह यांच्या आधी रामविलास पासवान लोक जनशक्ती पक्ष आणि उपेंद्र कुशवाहा यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुऴे जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी मदत होईल. भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार अमित शाह यानंतरच नीतीश कुमार यांच्यासोबत जागा वाटपावर चर्चा करतील. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लोजपने तीन आणि रालोसपाने 3 जागांवर विजय मिळवला होता.