close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रश्नांची उत्तरे नसतील तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा- राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानीच्या खिशात टाकल्याचा आरोप 

Updated: Oct 11, 2018, 02:09 PM IST
प्रश्नांची उत्तरे नसतील तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा- राहुल गांधी

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डील प्रकरणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्यावसायिक अनिल अंबानी यांच्यावर निशाणा साधलायं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानीच्या खिशात टाकल्याचा आरोप राहुल यांनी केलायं. संरक्षणमंत्र्यांच्या फ्रान्स दौऱ्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

राजीनामा द्यावा 

 मी देशाचा चौकीदार असल्याचं पंतप्रधान म्हणाले होते पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी जे आश्वासन दिलं होतं त्यावर काहीच बोलत नाहीत. जर त्यांच्याकडे उत्तर नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केलीयं.  आपली बाजू घेण्यासाठी द सॉल्ट कंपनीवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केलायं.