मी नरेंद्रभाई नाही, माणूस आहे आणि चुका करतो - राहुल गांधी

सोशल वेबसाईट ट्विटरवर महागाईचे चुकीचे आकडे टाकल्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दमदार प्रत्युत्तर दिलंय. 

Updated: Dec 6, 2017, 06:16 PM IST
मी नरेंद्रभाई नाही, माणूस आहे आणि चुका करतो - राहुल गांधी

नवी दिल्ली : सोशल वेबसाईट ट्विटरवर महागाईचे चुकीचे आकडे टाकल्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दमदार प्रत्युत्तर दिलंय. 

'मी नरेंद्र भाईंसारखा नाही... मी माणूस आहे आणि माझ्याकडून चुका होतात' असं ट्विट करत राहुल गांधींनी एकीकडे आपली चूक मान्य केली तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही हाणलाय.

राहुल गांधींनी ट्विटरवरून मोदी सरकारला सात प्रश्न विचारले होते.... गुजरातमधील महागाईचे काही आकडे पोस्ट करत त्यांनी महागाईचा हिशोब मागितला होता... परंतु, हिशोब चुकला आणि आकडे पोस्ट करताना त्यांची इथेही थोडी चूक झाली... साहजिकच ट्रोलर्सनं त्यांना पुन्हा एकदा घेरलं. त्यावरच राहुल गांधी प्रत्युत्तर देत होते.