'राहुल गांधीच देशातील सर्वात फिट नेता'; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीड़ियावर तुफान वायरल होत आहे.

Updated: Feb 28, 2021, 12:21 PM IST
'राहुल गांधीच देशातील सर्वात फिट नेता'; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल title=

मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीड़ियावर तुफान वायरल होत आहे. हा फोटो केरळमधील आहे. मच्छीमारांचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि त्यांची पद्धत जाणून घेण्यासाठी खासदार राहुल गांधी मच्छीमारांसोबत समुद्रात उतरले होते. 

राहुल गांधी यांनी समुद्रात उडी घेतल्यानंतर त्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. मात्र आता देशभरात चर्चा आहे ती एका फोटोची. याचं कारणही खास आहे. समुद्रातून बाहेर आल्यानंतर राहुल गांधींच्या शरीरयष्टीची चर्चा रंगली आहे. 

नेहमी कुर्त्यामध्ये दिसणारे राहुल गांधी यावेळी मात्र शर्ट आणि पॅन्टमध्ये होते. पाण्यात भिजल्यामुळे त्यांच्या बायसेप्स आणि अॅब्सची चर्चा मात्र सोशल मीडियावर तुफान होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चाच रंगली आहे.

काँग्रेस मंत्र्यांची राहुल गांधींच्या फोटोवर भन्नट कमेंट्स

काँग्रेस मंत्री राजीव शुक्ला यांनी राहुल गांधीं यांचा फोटोवर भन्नट कॅप्शन लिहिलं आहे. मच्छीमारांना कोणत्या गोष्टीत्या समस्यांचा सामना करावा लागतो ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ते त्यांच्यासोबत दिड तास पाण्यात होते. 

नेटकऱ्यांनी राहुल गांधींना देशातील सर्वात फीट नेता अशी उपमाच दिली आहे. दरम्यान राहुल गांधी यांचा हा फोटो केरळ येथील मच्छीमारा सोबतच असून यांनी थेट पाण्यात उतरुण कोलम येथील स्थानिक मच्छीमारांसोबत मासेमारी केली. त्यांनी पाण्यामध्ये उतरुन मासेमारी नेमकी कशी करतात, हे अनुभवले. त्यांनी स्व:तसुद्धा मासेमारी केली. यावेळी बोटीतून उडी घेताना, तसेच समुद्रात मच्छीमारांसोबत मासेमारी करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत.