कर्नाटक: मोदीजी फक्त ५ मिनिटे बोलून दाखवा; राहुल गांधींनी दिले आव्हान

 २३ प्रकरणामध्ये गुन्हे दाखल असूनही येडिययुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार केल्याबद्धल मोदी काही बोलणार का, असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना विचारला आहे.

Updated: May 5, 2018, 12:12 PM IST
कर्नाटक: मोदीजी फक्त ५ मिनिटे बोलून दाखवा; राहुल गांधींनी दिले आव्हान  title=

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराने आता सर्वोच्च टोक गाठले असून, राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जोरदार धडाडू लागल्या आहेत. निवडणूक एका राज्याची असली तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील संघर्षामुळे या निवडणुकीकडे आता अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांना हातात कागद न घेता १५ मिनिटे बोलण्याचे आणि भाषणात ५ वेळा विश्वेश्वरय्या बोलण्याचे आव्हान नरेंद्र मोदी यांनी दिले. यावर आता राहुल गांधी यांनीही आपल्या खास स्टाईलने मोदींवर पलटवार केला आहे. राहुल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ ५ मिनिटे बोलण्याचे आव्हान दिले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे की, प्रिय मोदीजी आपण बोलता तर खूप. पण, आपले शब्द आणि आपले काम यांचा मेळ बसत नाही.

व्हिडिओच्या माध्यमातून मोदींवर प्रश्नांची बरसात  

राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत भाजपने कर्नाटकमध्ये भ्रष्ट नेत्यांना तिकीट दिल्याबद्धल टीका करण्यात आली आहे. राहुल यांनी विचारले आहे की, 'मोदीजी, तुम्ही रेड्डी ब्रदर्स गँगला ८ तिकिटे दिलीत. त्यावर ५ मिनीटे बोलू शकाल?' तसेच, येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीबदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याबाबतही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. व्हिडिओत आरोप करण्यात आला आहे की, २३ प्रकरणामध्ये गुन्हे दाखल असूनही येडिययुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार केल्याबद्धल मोदी काही बोलणार का, असा सवालही विचारण्यात आला आहे.

मोदी विरूद्ध राहुल गांधी थेट संघर्ष

या व्हिडिओत कर्नाटक भाजपच्या टॉप ११ नेत्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान देण्याची सुरूवात राहुल गांधी यांच्या एका आव्हानाने झाले. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून बोलाताना दावा केला होता. की, आम्ही नीरव मोदी, राफेल डील यांसारख्या मुदद्यांवरून संसदेत १५ मिनिटे बोलण्याची सलंधी मिळाली तर, राहुल गांधी संसदेत उभेही राहणार नाहीत.