राहुल गांधी भारतीय सैन्याचे मनोबल खच्ची करतायत; भाजपची घणाघाती टीका

राहुल गांधींना आंतरराष्ट्रीय करार आणि नियमांविषयी काही समजते का? 

Updated: Jun 20, 2020, 03:32 PM IST
राहुल गांधी भारतीय सैन्याचे मनोबल खच्ची करतायत; भाजपची घणाघाती टीका title=

नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्ये भारतीय लष्कराचे मनोबल खच्ची करणारी असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली. ते शनिवारी भाजपच्या जनसंवाद रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जेपी नड्डा यांनी म्हटले की, गलवान खोऱ्यात सध्या भारत लढत असताना आपले नेते (राहुल गांधी) दररोज ट्विट करून आपल्याच सैन्याचे मनोबल खच्ची करत आहेत. ही ट्विटस त्यांच्या बुद्धीची मर्यादा दाखवून देणारी आहेत. भारतीय सैनिक सीमेवर निशस्त्र का गेले, असा सवाल राहुल गांधी विचारतात.

गलवान खोऱ्यातील परिस्थितीविषयी शरद पवारांचा मोदी सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले...

त्यांना आंतरराष्ट्रीय करार आणि नियमांविषयी काही समजते का? मुळात भारतीय सैनिक गलवान खोऱ्यात निशस्त्र गेलेच नव्हते. त्यामुळे राहुल गांधी आपली अक्कल का पाजळत आहेत, असा सवाल जेपी नड्डा यांनी उपस्थित केला.राहुल गांधींची ट्विटसमधील भाषाही भारतीय संस्कृतीला साजेशी नाही. एखाद्या व्यक्तीची भाषा ही त्याचे संस्कार दाखवून देते. राहुल गांधी सध्या जी भाषा वापरत आहेत, तसे संस्कार भारतीय कुटुंबांमध्ये केले जात नाहीत.

निशस्त्र सैनिकांविषयी राहुल गांधींच्या मुद्दयाशी शरद पवारांची अप्रत्यक्ष असहमती

काँग्रेससारख्या ऐतिहासिक पक्षाचे नेते पंतप्रधानांविषयी बोलताना अशाप्रकारची भाषा वापरतात, ही दुर्दैवी गोष्ट आहे. राहुल गांधी यांनी जिथे आपल्या पंतप्रधानांचा अध्यादेश फाडला होता, ते नरेंद्र मोदींचा आदर काय करणार, अशी बोचरी टीका यावेळी नड्डा यांनी केली.