राहुल गांधींनी रुग्णालयात घेतली वाजपेयींची भेट

राहुल गांधी वाजपेयींच्या भेटीला

Updated: Jun 11, 2018, 09:42 PM IST

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाजपेयींची नियमित तपासणी असल्याची माहिती एम्स रुग्णालयानं दिली आहे. मात्र तरीही वाजपेयी पुढील काही काळ निरीक्षणाखाली राहणार असल्याचं एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. दरम्यान वाजपेयींची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एम्स रुग्णालयात गेले. यावेळी राहुल गांधी यांनी वाजपेयींच्या 
प्रकृतीची विचारपूस केली.