Rahul Gandhi on Gujrat viral video : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची वणवण सर्वांनी पाहिली असेल. पण, नोकरीसाठीची चेंगराचेंगरीसम परिस्थिती पाहिलीय का? देशभरात मागील काही तासांपासून एका व्हिडीओची प्रचंड चर्चा असून, एका व्हिडीओनं अनेकांचीच चिंता वाढवली आहे. त्याहीपेक्षा देशातील बेरोजगारीचा मुद्दा या व्हिडीओमुळं पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर येताना दिसत आहे.
गुजरातच्या भरूचमधील एका नोकरीसाठीच्या मुलाखतस्थळावरील व्हिडीओ सध्या चिंतेचा विषय ठरत असून, राजकीय वर्तुळापासून सामान्यांपर्यंत याच व्हिडीओची चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही विदारक परिस्थिती पाहून सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सबंध भाजपच्या फळीला खडे बोल सुनावले आहेत.
एका खासगी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्साठी शेकडोंच्या संख्येनं इच्छुकांनी मुलाखतस्थळी गर्दी केली. ही गर्दी इतकी वाढली की, तिथं असणारी संरक्षणक जाळीही तुटली. चेंगराचेंगरीसम परिस्थिती निर्माण झाली आणि हा संपूर्ण सावळा गोंधळ पाहून देशातील परिस्थिती नेमकी किती गंभीर वळणावर पोहोचली आहे, या गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधलं.
'बेरोजगारीचा हा आजार भारतात सध्या महामारीचं रूप घेताना दिसत असून, भाजपशासित राज्य या आजारपणातं केंद्र झाली आहेत. एका सामान्य नोकरीसाठी रांगेत धक्के, खस्ता खाणारं भारताचं भविष्य पाहता हेच नरेंद्र मोदी यांच्या अमृतकाळातील वास्तव आहे', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
ભરૂચમાં બેરોજગારીને ઉજાગર કરતો વીડિયો સામે આવ્યો
10 પોસ્ટ માટેના ઇન્ટરવ્યૂમાં હજારો યુવાનો પહોંચ્યા
ઇન્ટરવ્યૂ માટે થયેલી ભીડમાં થઈ ધકકા મુક્કી
ભીડ એટલી ભારે હતી કે હોટેલની રેલીંગ તુટી ગઈ
થર્મેક્સ કંપની દ્વારા અંકલેશ્વરની લોર્ડ્સ પ્લાઝા હોટલમાં ઇન્ટરવ્યુનું આયોજન થયું હતું pic.twitter.com/d2hBfZrr5q
— Darshan Chaudhari (@Bajarangi_) July 11, 2024
भरुचच्या या व्हिडीओनंतर सपा अध्यक्ष अखिलेश कुमार यादव यांनीसुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि इथं त्यांनी खोट्या विकासाचा चेहरा समोर आल्याच्या आशयानं ट्विट केलं. 'हे आहे खोट्या विकासाच्या गुजरात मॉडेलमागचं सत्य... दहा- वीस हजारांसाठी काही रिक्त जागांसाठी ही गर्दी... भाजपनं देशभरातील तरुणाईला बेरोजगारीच्या गर्त छायेत लोटलं आहे. ही तिच तरुणाई आहे, जी भाजपला सत्तेतून हटवत त्यांच्या भविष्याचा मार्ग निश्चित करणार आहे. कारण, भाजप असेपर्यंत तर काही आशा, अपेक्षाच नाही.... '