नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असल्याचे पाहायला मिळत आहे.
सत्ताधारी पक्षाच्या धोरणातील त्रुटी दाखविण्यापासून ते राष्ट्रपुरूषांना मानवंदना देण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत असतात.
यावेळेस त्यांनी एक ट्विट करुन मराठी मनं जिंकली आहेत.
शिवजयंतीनिमित्त राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट केलीए. शिवाजी महाराजांना त्यांनी मुजरा केला.
यासाठी मराठी भाषेचा उपयोग केलाय.
रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा! pic.twitter.com/wuzArakrpw
— Office of RG (@OfficeOfRG) 19 February 2018
रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा!, असा संदेश राहुल यांनी ट्विट केला आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
शिवाजी महाराजांसारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारत भुमिला अभिमान आहे. शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमधून म्हटले.