मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो नेपाळला गेल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यादरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याने सर्वत्र एकच गोंधळ उडवून दिला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका पबमध्ये आहेत आणि त्यांच्या अवती-भवती मुली देखील असल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच कारणामुळे सर्वत्र या व्हिडीओची चर्चा सुरु झाली.
राहुल गांधी काठमांडूमधील लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स या प्रसिद्ध पबमध्ये असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे भाजपने मात्र राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
तसे पहाता हा राहुल गांधीचा हा पर्सन वेळ आहे आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं आयुष्य जगू शकतात. परंतु याच मुद्याला धरुन भाजपच्या नेत्याने त्यांच्यावर निशाणा साधला.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विट केले की, 'हा राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय नाही. राहुल गांधी कोणासोबत आहेत? ते चीनमध्ये एजंट आहेत का? राहुल गांधींनी लष्कराविरोधात जे ट्विट केले ते चीनच्या दबावाखाली आहे का? हा प्रश्न राहुल गांधींचा नसून देशाचा आहे.
अमित मालवीय यांनी देखील राहुल गांधींवर निशाणा साधला
त्याचवेळी भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट केले की, मुंबईला वेढा घातला असताना राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते आणि तो त्या वेळेला नाईट क्लबमध्ये आहे, जेथे त्याची स्वत:ची पार्टी (काँग्रेस) संपत चालली आहे.
नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला असला तरी, त्या व्हिडीओमधील व्यक्ती खरंच राहुल गांधी आहेत का? किंवा हा व्हिडीओ फेक आहे की खरा, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी 5 दिवसांच्या वैयक्तिक दौऱ्यावर नेपाळला पोहोचले आहेत. राहुल गांधी नेपाळच्या वास्तव्यादरम्यान काही पर्यटन स्थळांनाही भेट देऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नेपाळमधील त्यांची मैत्रीण सुम्निमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले आहेत.