आता Railway चं तिकीट रद्द करण्यासाठीही मोजा पैसे, प्रवाशांचा संताप

तिकीट रद्द केल्यास.... जरा सांभाळून 

Updated: Sep 2, 2022, 08:18 AM IST
आता Railway चं तिकीट रद्द करण्यासाठीही मोजा पैसे, प्रवाशांचा संताप title=
Railway issues new Ticket Cancellation policy read details

GST on Train Ticket Cancellation: (Express trains) लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील वातानुकूलित श्रेणीचं निश्चित झालेलं आरक्षण अर्थात आरक्षित तिकीट रद्द केल्यास जीएसटी लागू होणार आहे. निश्चित झालेलं आरक्षण तिकीट रद्द (Reservation) करताना रेल्वे काही टक्के रक्कम कापून घेते त्यात आता नव्यानं जीएसटीचीही भर पडणार आहे. 

अर्थ मंत्रालयानं यासंदर्भात परिपत्रकही काढलं आहे. त्यानुसार रेल्वेचं निश्चित केलेलं तिकीट रद्द करण्यासोबतच हॉटेलचं आरक्षण रद्द केल्यासही जीएसटी आकारला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. GST अर्थ मंत्रालयाकडून आकारण्यात येतो. जो फक्त एसी आणि प्रथम श्रेणी तिकीटांवर लागू असेल. 

कोणत्या तिकीटांवर किती Cancellation Charge? 
(Indian Railway) रेल्वेच्या तिकीट रद्द करण्याच्या नियमांनुसार Confirm Ticket रेल्वे निघण्याच्या 48 तासांच्या आत रद्द केलं जातं. त्यासाठी AC First Class वर 240 रुपये, AC 2 tier वर 200 रुपये, AC 3 tier आणि Chair Car वर 180 रुपये, Sleepar class वर 120 रुपये आणि द्वितीय श्रेणी वर 60 रुपये Cancellation Charge आकारला जातो. 

वाचा : Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

रेल्वे सुटण्याच्या 12 तासांपूर्वी तिकीच रद्द केल्यास तिकीट दराच्या 25 टक्के शुल्क Cancellation Charge म्हणून आकारलं जातं. तर हीच बाब 4 तासांच्या आत घडल्यास तिकीटाच्या रकमेचा 50 टक्के भाग दंड स्वरुपात आकारला जातो.