मुंबई : सौंदर्याची कायम चर्चा ही होतेच
राजस्थानचे भरतपुर जिल्ह्यातील गरहाजन गावातील कमा पंचायतीत नवी महिला सरपंच. पहिल्यांदा या पंचायतमध्ये एमबीबीएस आणि एवढी सुंदर युवा सरपंच पाहायला मिळाली आहे. 24 वर्षीय शहनाज खानला सरपंच होण्यासाठी संपूर्ण गावाचा आर्शिवाद मिळाला आहे. शहनाज आपल्या शिक्षणामुळे जेवढी ओळखली जाते तेवढीच ती आपल्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत आहे.
सरपंच निवडणूकीनंतर सोशल मीडियावर शहनाजची भरपूर चर्चा झाली. शहनाजने सांगितले की, मी खूप खूष आहे की मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. माझी प्राथमिकता मुलीचं शिक्षण आणि स्वच्छता असणार आहे.
मी मुलींसाठी एक उत्तम उदाहरण निर्माण करू इच्छिते. मुलींच्या शिक्षणासाठी मला खास कामगिरी करायची आहे.
शहनाज खानचा संबंध राजकारणी घराण्याशी आहे. तिचे आजोबा अनेक दशकं कमां पंचायतीचे सरपंच होते.