निवडणुकीआधी राजस्थान सरकारची लोकांना मोठी खूशखबर

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारने निवडणुकीआधी लोकांना मोठी खूशखबरी दिली आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 6, 2018, 08:22 PM IST
निवडणुकीआधी राजस्थान सरकारची लोकांना मोठी खूशखबर title=

जयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारने निवडणुकीआधी लोकांना मोठी खूशखबरी दिली आहे. 

लोकांना मोठा दिलासा

सरकारने राज्य महामार्गावर सर्व खासगी वाहनांना टोल माफी केली आहे. आता फक्त टॅक्सी चालक आणि मालवाहतूक वाहनांना टोल द्यावा लागणार आहे. याशिवाय सरकारने नोकऱ्यांसाठीचं अधिक वय ४० वर्ष करण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे.

ईशान्यातील विजयावर प्रतिक्रिया

सीएम वसुंधरा राजे यांनी विश्वास दर्शवला आहे की, 'राज्यात पुन्हा भाजप सरकार येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्व आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजपने ईशान्यमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत पक्षाने हे सिद्ध केलं आहे की, भाजप शिवाय आता पर्यात नाही.'