PAN Card चा होतोय चुकीचा वापर, जाणून घ्या कशी तपासाल History

सर्व करसंबंधित कामांसाठी आणि बऱ्याच व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो.  

Updated: Apr 3, 2022, 10:21 AM IST
PAN Card चा होतोय चुकीचा वापर, जाणून घ्या कशी तपासाल History  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड नंबर हे सध्याच्या घडीला महत्त्वाच्या कागदपत्र पुराव्यांपैकी एक आहे. आयकर विभागाकडून पॅन कार्ड नागरिकांना देण्यात येतं. यामध्ये  10 आकडे असणारा एक युनिक अल्फान्यूमरिक नंबर असतो. सर्व करसंबंधित कामांसाठी आणि बऱ्याच व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. (Pan Card)

गेल्या काही काळापासून मात्र याच पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्याच्या घटना वाढल्या. यामध्ये कलाकारही फसल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री सनी लिओनी हिच्यानंतर आता राजकुमार राव याच्याही पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीनं वापर झाल्याची माहिती समोर आली.

ट्वीट करत त्यानं यासंदर्भातली माहिती दिली. आपल्या पॅन कार्डचा वापर चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं सांगितलं. त्यामुळं पॅन कार्डची हिस्ट्री पाहणं आणि सर्व माहितीचा तपशील लक्षात घेणं कायम महत्त्वाचं ठरतं.

कशी तपासाल पॅन कार्डची हिस्ट्री...

  • पॅन कार्डची हिस्ट्री तपासण्यासाठी सर्वात आधी https://www.cibil.com/  या संकेतस्थळाला भेट द्या.
  • पुढे ‘गॉय युअर सिबिल स्कोअर’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर सब्सक्रिप्शन प्लानमधून कोणताही एक प्लान सिलेक्ट करा.
  • आता तुमचा मोबाईल नंबर, जन्माची तारीख, इमेल आयडी अशी माहिती द्या. यानंतर लॉगइन करण्यासाठी पासवर्ड तयार करा. आयटी टाईपमध्ये ‘इनकम टॅक्स आयडी’चा पर्याय निवडा.
  • आता इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाका आणि ‘वेरिफाय युअर आयडेंटिटी’ या पर्यायाची निवड करा. आवश्यक माहितीची पूर्तता करा. त्यानंतर काही फी भरा आणि अकाऊंट लॉग इन करा.
  • आता तुमच्यासमोर एक फॉर्म येईल, ज्यातून तुमच्या अकाऊंटवर किती कर्ज आहे, हेसुद्धा कळेल.
  • जर तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर करण्यात आला, तर तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही यासंबंधीची तक्रार देऊ शकता.