मुंबई : 2021 या वर्षात राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील अनेक शेअर्स तेजीत आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये किमान 8 स्टॉक्स असे आहेत, ज्यांनी तब्बल 100% किंवा त्याहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.
राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मानले जातात. ते ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात ते शेअर नक्कीच चांगले रिटर्न्स देतात. विशेष म्हणजे त्यातले काही शेअर मल्टीबॅगर्स देखील ठरले आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांची त्यांच्या पोर्टफोलिओकडे नेहमी नजर असते.
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सपैकी मॅन इन्फ्रा (Man Infraconstruction)शेअरने 2021 वर्षात सर्वाधिक रिटर्न दिले आहे. Man Infra शेअरने 343 टक्के रिटर्न दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 23 रुपयांवरून 101 रुपयांपर्यंत वाढली.
Aptech लिमिटेडने यावर्षी आतापर्यंत 160 टक्के रिटर्न दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 157 रुपयांवरून 407 रुपयांपर्यंत वाढली. Tata Motors ने यावर्षी 154 टक्के रिटर्न दिला आहे. 1 जानेवारीपासून शेअरची किंमत 187 रुपयांवरून 474 रुपयांपर्यंत वाढली आहे.
Jubilant Ingreviaने यावर्षी 105 टक्के रिटर्न दिला आहे. 1 जानेवारीपासून आजपर्यंत शेअरची किंमत 268 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर Tarc Ltd ने यावर्षी आतापर्यंत 109 टक्के रिटर्न दिला आहे.
1 जानेवारीपासून शेअरची किंमत 24 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढली आहे.
Indiabulls Real Estateने या वर्षी आतापर्यंत 100% रिटर्न दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 81 रुपयांवरून 161 रुपयांपर्यंत वाढली. National Aluminium Company Limited ने यावर्षी आतापर्यंत 123% रिटर्न दिला आहे.
शेअरचा भाव 44 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढला. तर Anant Raj यांनी या वर्षी आतापर्यंत 181 टक्के रिटर्न दिला आहे. 1 जानेवारीपासून शेअरचा भाव 27 रुपयांवरून 76 रुपयांपर्यंत वाढला आहे.
Orient Cementने यावर्षी आतापर्यंत 81 टक्के रिटर्न दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 88 रुपयांवरून 159 रुपयांपर्यंत वाढली.
Bilcare Ltdने या वर्षी आतापर्यंत 86 टक्के रिटर्न दिला आहे. यादरम्यान शेअरचा भाव 44 रुपयांवरून 82 रुपयांपर्यंत वाढला. यावर्षी CRISILमध्ये गुंतवणूकदारांना 53 टक्के रिटर्न मिळाला आहे.
1 जानेवारीपासून शेअरची किंमत 1916 रुपयांवरून 2940 रुपयांवर गेली आहे. त्याचवेळी Fortis Healthcareमध्ये गुंतवणूकदारांना यावर्षी 86 टक्के रिटर्न मिळाला आहे.
यादरम्यान शेअरचा भाव 156 रुपयांवरून 291 रुपयांपर्यंत वाढला. Titan Companyने यंदा 54 टक्के रिटर्न दिला आहे. 1 जानेवारीपासून शेअरची किंमत 1559 रुपयांवरून 2394 रुपयांपर्यंत वाढली आहे.