राकेश झुनझूनवालांच्या या स्टॉकमध्ये होणार मोठी घसरण? ब्रोकरेज हाउसने दिला विक्रीचा सल्ला

 शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवालांच्या  पोर्टफोलिओमध्ये सामिल सर्वात जास्त रिटर्न देणारा शेअर Titan होय. हा शेअर मल्टीबॅगर स्टॉकच्या लिस्ट मध्ये येतो.  

Updated: Aug 6, 2021, 12:21 PM IST
राकेश झुनझूनवालांच्या या स्टॉकमध्ये होणार मोठी घसरण? ब्रोकरेज हाउसने दिला विक्रीचा सल्ला title=

मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवालांच्या  पोर्टफोलिओमध्ये सामिल सर्वात जास्त रिटर्न देणारा शेअर Titan होय. हा शेअर मल्टीबॅगर स्टॉकच्या लिस्ट मध्ये येतो.  टायटनने दीर्घ काळापासून गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. परंतु या शेअरमधील तेजी थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या व्यवसायायवर मोठा परिणाम झाला आहे. दिग्गज ब्रोकरेज हाउससुद्धा सध्या या कंपनीचे शेअर विकण्याचा सल्ला देत आहेत.

शेअरमध्ये होऊ शकते मोठी घसरण
ब्रोकरेज हाउस गोल्डमॅन सॅक्सने शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी 896 चे लक्ष दिले आहे. शेअरची सध्याची किंमत 1800 रुपये इतकी आहे. 

ब्रोकरेज हाउस CLSAने सुद्धा या शेअरमध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. तसेच या शेअरसाठी 1380 रुपयांचे लक्ष दिले आहे. या ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, शेअरची वॅल्युएशन जास्त झाली आहे. कोविड 19 चा परिणाम म्हणून लाईफस्टाइल सेगमेंटमध्ये दबाव असल्याचे दिसत आहे. 

ब्रोकरेज हाउस मॉर्गन स्टॅनलेनेसुद्धा टायटन कंपनीवर इक्वल वेटची रेटींग दिली आहे. तसेच शेअरसाठी 1358 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. 

असे असले तरी, मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज हाउसने टायटन वर विश्वास दाखवला आहे. त्यासाठी त्यांनी 2065 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. कोविड 19 च्या परिस्थितीतही कंपनी नफ्यात आहे. लग्नसराई तसेच सणासुदीच्या दिवसांमध्ये कंपनीचे व्यवहार पुन्हा जोमात होतील असा या ब्रोकरेज हाउस विश्वास आहे.

कंपनीचा निकाल
टायटन कंपनीचा जून तिमाहीचा निकाल गेल्या तिमाही पेक्षा चांगला राहिला आहे. ज्वेलरी सेगमेंट वगळता इतर सेगमेंटमध्ये दबाव असल्याचे दिसून येत आहे.  कंपनीला जून तिमाहीत 61 कोटींचा नफा झाला आहे.