'राम मंदिर होणारच, सर्वोच्च न्यायालय आमचंच आहे'

आम्ही राम मंदिराच्या निर्माणासाठी कटिबद्ध आहोत.

Updated: Sep 9, 2018, 05:22 PM IST
'राम मंदिर होणारच, सर्वोच्च न्यायालय आमचंच आहे' title=

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार मुकुट बिहारी वर्मा यांचे विधान यासाठी कारणीभूत ठरले आहे. मुकुट वर्मा यांनी म्हटले की, भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आहे. मात्र, आम्ही राम मंदिराच्या निर्माणासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे ते होणारच, कारण सर्वोच्च न्यायालय आमचेच आहे, असे मुकुट वर्मा यांनी सांगितले. 

या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्याचे लक्षात येताच मुकुट शर्मा यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. आपण या देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे न्यायालयावर आपला संपूर्ण विश्वास आहे, असे मी म्हणालो होतो. न्यायालयावर सरकारचे वर्चस्व आहे, असे मी म्हणालोच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.