प्रभू राम उत्तर भारताचे, श्रीकृष्ण संपूर्ण देशाचे : मुलायम सिंह

प्रभू रामचंद्रांची पूजा केवळ उत्तर भारतात केली जाते. तर, भगवान श्रीकृष्णाची पूजा संपूर्ण देशात केली जाते, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे जेष्ठ सल्लागार मुलायम सिंग यादव यांनी केले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 20, 2017, 08:13 PM IST
प्रभू राम उत्तर भारताचे, श्रीकृष्ण संपूर्ण देशाचे : मुलायम सिंह title=

गाझियाबाद : प्रभू रामचंद्रांची पूजा केवळ उत्तर भारतात केली जाते. तर, भगवान श्रीकृष्णाची पूजा संपूर्ण देशात केली जाते, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे जेष्ठ सल्लागार मुलायम सिंग यादव यांनी केले आहे.

अखिलेशच्या वक्तव्याला मुलायम यांचा पाठींबा

मुलायम सिंग यांच्या वक्तव्यामुवळे उत्तर प्रदेशच नव्हे तर, संपूर्ण देशाचेर राजकारण पुन्हा एकदा वेगळ्या वळणार येऊन ठेपले आहे. या राजकारणामुळे पुन्हा एकदा आपल्या धार्मिक प्रतिकांना घेऊन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि मुलायम सिंग यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी भगवान श्रीकृष्णाची 50 फुट उंचीची भव्य मुर्ती उभारण्याबाबतची घोषणा केली होती. अखिलेश यांच्या समर्थनार्थ बोलताना मुलायम यांनी हे विधान केले आहे.

भाजप केवळ धार्मीक राजकारण करते

गाजियाबाद येथील वैशाली सेक्टर-4मध्ये एका विवाह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुलायमसिंग आले होते. यावेळी बोलतना मुलायम म्हणाले, भाजप केवळ धर्माचे राजकारण करत आहे. विकासाचे नाही. आयोध्या राममंदिर, दीपोत्सव आणि बनारसमध्ये आरती यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन जाणीवपूर्वक केले जात आहे. समाजवादी पक्षाने शेतकरी आणि विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण केले असेही मुलायमसिंग म्हणाले.   

राम विरूद्ध श्रीकृष्ण वाद रंगण्याची शक्यता...

भाजपकडून सातत्याने पुढे करण्यात येणाऱ्या आयोध्देतील राम मंदिर मुद्द्याची धार कमी करण्यासाठी समाजवादी पक्षाने ही चाल खेळली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या खेळीमुळे येत्या काळात राम विरूद्ध श्रीकृष्ण वाद रंगण्याची शक्यता वाढली आहे.