Ramdev Baba's Remark on Women Clothes : महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त विधान योगगुरु रामदेव बाबांना चांगलंच भोवलं आहे. महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी महिला आयोगाला पत्र लिहून माफीनामा सादर केला आहे. आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला असं त्यांनी राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.
ठाण्यात (Thane) झालेल्या योगा (Yoga)कार्यक्रमात रामदेव बाबांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं. त्यानंतर देशभरात नाराजीचे सूर उमटले होते. "तुम्ही साडीमध्येही चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसता, माझ्या प्रमाणे काही नाही घातलं तरी चांगल्या दिसता," असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. (Ramdev Babas Statement on Women Clothes Apologized to Women Commission and women look good even if they are not wearing clothes)
या कार्यक्रमात महिलांसाठी योगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र योगानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांना त्यांनी योगासाठी घातलेले ड्रेस बदलता आले नाहीत. योगा कार्यक्रमानंतर महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.