रामनाथ कोविंद यांचा बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा

भाजपने एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. मंगळवारी कोविंद यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला आहे. आता पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

Updated: Jun 20, 2017, 04:08 PM IST
रामनाथ कोविंद यांचा बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा title=

नवी दिल्ली : भाजपने एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. मंगळवारी कोविंद यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला आहे. आता पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी एनएडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आता कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ लागला आहे. रामनाथ कोविंद यांना एनडीएतील घटकपक्षापैकी शिवसेना वगळता सर्वांचा पाठिंबा आहेच. त्याचबरोबर दक्षिणतील राज्यांनी कोविंद यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात तेलंगाचे सत्ताधारी टीआरएस आंध्रप्रदेशातला प्रमुख पक्ष असणारा जगन रेड्डींचा वायएसआर काँग्रेस यांचा समावेश आहे.