बाबाचा कैदी क्रमांक बदलला

रोहतकच्या जेलची हवा खात असलेल्या गुरमीत बाबा राम रहिमच्या रात्रीची झोप गेलीय तर दिवसाचा आराम. अगदी ऐशोआरामात जगणाऱ्या या बलात्कारी बाबाच्या घशाखाली आता जेलचं जेवण जात नाही. जेलमध्ये चांगल जेवण मिळावं यासारखे अनेक नखरे बाबा दाखवत आहेत. मात्र, अधिकारी बाबाच्या या मागणीला धुडकावून लावत आहेत. एवढंच काय तर आता हा बाबा न राम राहिला आहे न रहिम आता याची ओळख कैदी क्रमांक ८६४७ अशी झाली आहे. बाबाचा कैदी नंबर बदलण्यात आला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 31, 2017, 01:36 PM IST
बाबाचा कैदी क्रमांक बदलला  title=

मुंबई : रोहतकच्या जेलची हवा खात असलेल्या गुरमीत बाबा राम रहिमची रात्रीची झोप गेलीय तर दिवसाचा आराम. अगदी ऐशोआरामात जगणाऱ्या या बलात्कारी बाबाच्या घशाखाली आता जेलचं जेवण जात नाही.

जेलमध्ये चांगल जेवण मिळावं यासारखे अनेक नखरे बाबा दाखवत आहे. मात्र, अधिकारी बाबाच्या या मागणीला धुडकावून लावत आहेत. एवढंच काय तर आता हा बाबा न राम राहिला आहे न रहिम आता याची ओळख कैदी क्रमांक ८६४७ अशी झाली आहे. बाबाचा कैदी नंबर बदलण्यात आला आहे. 

आता बाबाने जेलचे कपडे परिधान केले असून पहिल्या दिवशी जेलच्या मॅन्युअलनुसार त्याला ४ चपात्या आणि भाजी खायला दिली होती. मात्र बाबाने हे जेवण खाण्यास विरोध केला होता. न जेवण्याचं कारण अधिकाऱ्यांनी विचारलं तर बाबाने गप्प बसणं पसंत केलं. मात्र त्याने आपली तब्बेत ठिक नसल्याचं कारण देतं अधिकाऱ्यांना डॉक्टरांना बोलवायला लावलं. मात्र, उगाच काळजी केल्यामुळे बाबा थोडा चिंताग्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

मात्र त्यानंतरही बाबाने जेवण्यास विरोध दर्शवला. तेव्हा आपल्या अधिकाराचा वापर करत अधिकाऱ्यांनी जोर जबरदस्ती केल्याने फक्त अर्धी चपाती बाबाने खाल्ली. एवढंच काय तर बाबा रात्रभर झोपला देखील नव्हता अशी माहिती मिळाली आहे. राम रहिमच्या कुटुंबियांना ३० ऑगस्ट रोजी भेटण्यास परवानगी देण्यात आली होती.