Ratan Tata यांच्या खांद्यावर हात ठेवून उभा असलेला हा तरुण आहे तरी कोण?

त्यांची भाषणे आणि किस्से सोशल नेटवर्कवर सतत व्हायरल होत असतात.

Updated: Jan 1, 2022, 05:26 PM IST
  Ratan Tata यांच्या खांद्यावर हात ठेवून उभा असलेला हा तरुण आहे तरी कोण? title=

मुंबई : जगातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक, उद्योगपती रतन टाटा त्यांच्या कार्यासाठी जगभरात ओळखले जातात. रतन टाटा यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी त्यांचा 84 वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये रतन टाटा खुर्चीवर बसून समोर असलेला छोटा कप केक कापताना दिसत आहेत.

रतन टाटा यांनी समोरील मेणबत्ती फुंकून केक कापला. त्यानंतर त्यांच्याजवळ बसलेल्या तरुणाने रतन टाटा यांच्या खांद्यावर हात ठेवला. मग तो खाली बसला आणि रतन टाटा यांना कापलेल्या कप केकचा तुकडा खायला दिला.

रतन टाटा यांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रतन टाटा यांनी मोठा वाढदिवस न करता, साधा एक छोटा केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे दिसून येत आहे.

या सेलिब्रेशनमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडिओमध्ये रतन टाटा यांच्यासोबत केक कापणारा हा तरुण कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मुलाचा रतन टाटा यांच्याशी कोणताही कौटुंबिक संबंध नाही.

पण तरीही रतन टाटा यांनी वाढदिवस कोणासोबत साजरा केला हे आश्चर्यकारक आहे. मात्र, या तरुणाचे रतन टाटा यांच्याशी खास नाते आहे.

रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती कोण?

व्हिडिओमध्ये असलेल्या तरुणाचे नाव शंतनू नायडू आहे. तो रतन टाटा यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना केक भरवताना दिसत आहे. शंतनू हे रतन टाटा यांचे खाजगी सचिव आहेत. तसे, रतन टाटा तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणे आणि किस्से सोशल नेटवर्कवर सतत व्हायरल होत असतात.

पण, वयाच्या 85 व्या वर्षी एक तरुण रतन टाटा यांच्याकडे खासगी सचिव म्हणून काम करतो, हे फार कमी लोकांना माहीत आहे. मुंबईत राहणारे शंतनू नायडू हे एक भाग्यवान तरुण आहेत, या तरुणाच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभावित होऊन रतन टाटा यांनी त्याला स्वत: फोन केला आणि म्हणाले की, तु जे करतो ते पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. तू माझा सहाय्यक होशील का?