राज्य पोलिसांकडून आदेश वजा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडे जर वाहन असेल तर त्याची गाडी जागेवरच जप्त केली जाणार आहे. पोलिस ही सर्वात मोठी कारवाई 18 वर्षांपेक्षा कमी असलेल्या ड्रायव्हरवर करणार आहे. तसेच माल वाहतुकीच्या वाहन चालकांसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यांची वयोमर्यादा जर 20 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच ई-चलानसंदर्भात एक मॉडल ऑपरेटिंग सिस्टम जाहीर करण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. सुरेश कुमार मेकालाने हे नियम जाहीर केले आहेत. या प्रक्रियेत ईचलान जाहीर करणे आणि दंड वसुलीसोबतच वाहन जप्त करण्याबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. जर ड्रायव्हरचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर पोलीस ही कारवाई करणार आहेत.
संबंधित ड्रायव्हरच्या आई-वडिलांना पालक म्हणून बोलावलं जाणार आहे. त्यामुळे चालकासोबतच पालकांवरही कठोर कारवाई होणार आहे. नव्या नियमांनुसाप पोलिसांना आता गाडी जप्त करण्याचीही कारवाई करावी लागणार आहे.
ई चालानाबाबत जाहीर केलेल्या नियमांच्या माहितीनुसार, ई चालान दोन पद्धतीचे असतात कॉम्प्रोमाइज आणि नॉन कॉम्प्रोमाइज. यामध्ये सांगितले आहे की, करार केलेल्या ई चालानबाबत, जर दोषी व्यक्ती स्वेच्छेने रक्कम भरण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर सक्षम पोलीस अधिकाऱ्याला दंड स्वीकारावा लागेल. तसेच ई चालान भरणे आवश्यक आहे. जर संबंधित व्यक्ती करार दंड देण्यास तयार नसेल तर अशावेळी पोलीस न्यायालयात आरोपपत्र दाखल करु शकतात.
तडजोड न झालेल्या प्रकरणांमध्ये तत्काळ आरोपतपत्र जाहीर करण्याचे आदेश परिपत्रकात देण्यात आले आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्ती न्यायालयात हजर न झाल्यास वाहन जप्त केले जाऊ शकते. मात्र त्यासाठी न्यायालयाची रीतसर परवानगी घेऊन वाहन जप्त करण्यात याववे.
न्यायालयाच्या परवानगीशिवाय वाहने जप्त करु नये, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी सक्तीने वाहने जप्त केल्याने राज्य पोलिसांकडून नवीन परिपत्रक जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या परिपत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे.