Ration Card New Rules: रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card Holder) मोठी बातमी आहे. सध्या देशभरात मोफत रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून, या योजनेला पुढील ६ महिने मुदतवाढ देण्याचाही सरकार विचार करत आहे. या मोफत रेशन योजनेत अनेक अपात्र लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून ही परिस्थिती पाहता सरकारकडून मोठ पाऊल उचललं जाण्याची शक्याता आहे.
केंद्र सरकारने रेशन कार्ड रद्द करण्यासाठी काही नियम केले आहेत. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल तर तुमचं रेशन कार्ड देखील रद्द केलं जाईल. ज्या लोकांच रेशन कार्ड अपात्र आहे, त्यांनी स्वतःहून त्यांचं रेशनकार्ड रद्द करून घ्यावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
तुम्ही तुमचं रेशन कार्ड आता रद्द केलं नसेल, तर पडताळणीनंतर अन्न विभागाचं पथक ते रद्द करेल.
तुमच्या स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, खेड्यात दोन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न आणि शहरात वार्षिक तीन लाख असेल तर अशा लोकांनी त्यांचं रेशन कार्ड तहसीलमध्ये आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावं लागेल.
शासनाच्या नियमानुसार रेशन कार्डधारकाने कार्ड सरेंडर केलं नाही तर अशा लोकांचं कार्ड छाननीनंतर रद्द केलं जाणार आहे. यासोबतच, त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढचं नाही तर अशा लोकांकडून रेशन घेतल्याने रेशनही वसूल केलं जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सध्या गरिबांना मोफत 5 किलो धान्य देत आहे आणि असं मानलं जातय की, सरकार पुढील 3 ते 6 महिन्यांसाठी कालावधी वाढवू शकतं. यामुळे सरकारला 10 अब्ज डॉलर जास्तीचे पैसे लागणार आहेत.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.