अमित शाह, रविशंकर प्रसाद यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

अमित शाह, रविशंकर प्रसाद आणि कनिमोळी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील असे प्रमुख विजेते आहेत जे सध्या राज्यसभा सदस्य आहेत

Updated: May 29, 2019, 03:21 PM IST
अमित शाह, रविशंकर प्रसाद यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा  title=

नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सोपवलाय. दुसरीकडे, डीएमके नेत्या कनिमोळी यांनीही आपल्या राज्यसभा सदस्यत्वचा राजीनामा दिलाय. या तिनही नेत्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपापल्या पक्षांतून विजय मिळवलाय. बिहारच्या पाटना साहीब मतदारसंघातून रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला. तर अमित शाह पहिल्यांदाच लोकसभेत दाखल झाले आहेत. अमित शाह यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केलाय. त्यांनी काँग्रेसच्या सी जे चावडा यांना तब्बल ५.५७ लाख मतांनी पराभवाचा झटका दिला. 

राज्यसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरनुसार, आज तीन सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अमित शाह, रविशंकर प्रसाद आणि कनिमोळी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील असे प्रमुख विजेते आहेत जे सध्या राज्यसभा सदस्य आहेत. 

५४ वर्षीय अमित शाह पहिल्यांदाच लोकसभेत दिसणार आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी अर्थात राज्यसभेसाठी निवड झाली होती.