मुंबई : रिझर्व बँकेच्या पतधोरणाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी हा निर्णय मोठा धक्का देणारा आहे. आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आले आहेत. याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती गवर्नर शक्तीकांत दास यांनी दिली.
महागाईला अटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने रेपो रेट मे महिन्यात 0.40 टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. या दरवाढीनंतर 4.40 टक्के रेपो रेट झाला होता. आज 0.50 टक्क्यांनी आणखी रेपो दर वाढवण्यात आले आहेत. आता रेपो दर 4.90 % इतका असणार आहे.
The MPC voted unanimously to increase the policy repo rate by 50 bps to 4.90%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/KS8RswFIEy
— ANI (@ANI) June 8, 2022
यामुळे सगळ्या प्रकारची कर्ज महाग होणार आहेत. शक्तीकांत दास यांनी माहिती दिली.
एकीकडे महागाईने कहर केला आहे. दुसरीकडे आता कर्जावरील दर वाढणार असल्याने सर्वांना मोठा धक्का आहे.