RBIकडून व्याजदरात कपातीची शक्यता, घर-गाडी होणार स्वस्त

आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी पुढच्या बैठकीमध्ये व्याजदरांमध्ये कपात करू शकते. 

Updated: Oct 30, 2017, 07:15 PM IST
RBIकडून व्याजदरात कपातीची शक्यता, घर-गाडी होणार स्वस्त  title=

नवी दिल्ली : आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी पुढच्या बैठकीमध्ये व्याजदरांमध्ये कपात करू शकते. ६ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीमध्ये आरबीआय व्याजदरांमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात करू शकते असं बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हणलं आहे.

मेरिल लिंचनं दिलेल्या रिपोर्टनुसार महागाई दर स्थिर आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये CPI ३.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आरबीआय व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते.

आरबीआयकडून व्याजदरांमध्ये कपात झाली तर याचा सरळ फायदा सामान्य जनतेला होणार आहे. व्याजदरांमध्ये कपात झाल्यामुळे घर आणि गाडी घेण्यासाठीच्या कर्जामध्ये कपात होण्याची शक्यता आहे.