RBI Madetory Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं (RBI) शुक्रवारी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करण्यात आला. यामध्ये गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी व्याजदरात (Interest Rate) कोणतेही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
RBI गव्हर्नर दास यांनी रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. दुसऱ्या तिमाहीमध्ये GDP मध्ये अपेक्षेहून चांगली वाढ पाहत त्याच धर्तीवर सलग पाचव्यांदा रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. आरबीआयच्या या निर्णयामुळं आता रेपो रेटमध्ये कोणतेही बदल होणार नसल्यामुळं वैयक्तिक कर्ज (Personal Loan), वाहन कर्ज (Car Loan) , गृह कर्ज (Home Loan) किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जावर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
#WATCH | RBI Governor Shaktikanta Das says, "...The Monetary Policy Committee decided unanimously to keep the policy repo rate unchanged at 6.5%. Consequently, the Standing Deposit Facility rate remains at 6.25% and the Marginal Standing Facility rate and the Bank Rate at 6.75%." pic.twitter.com/yQSppS7IzJ
— ANI (@ANI) December 8, 2023
शक्तिकांता दास यांनी जीडीपीच्या वाढीसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य करत 2024 मध्ये हा आकडा 6.5 वरून 7 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेतला. शिवाय तिसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी ग्रोथ रेट 6.4 टक्के इतका ठेवला. दरम्यान, यावेळी त्यांनी साखरेच्या दरांमध्ये झपाट्यानं होणारी वाढ हा चिंतेचा विषय असल्याचंही म्हटलं. आरबीआयकडून व्याजाच्या दरात सध्या कोणाताही बदल झालेला नसला तरीही येत्या काळात मात्र बदलाचे संकेत स्पष्टपणे मिळाले आहेत. आरबीआयने शुक्रवारी पतधोरण जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 21 हजाराची पातळी ओलांडली तर सेन्सेक्सही 70 हजाराच्या पातळीच्या आसपास पोहोचला. एका आठवड्यात दुसऱ्यांदा शेअर बाजार 70 हजारांजवळ जाऊन माघारी फिरला.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 255/5
|
VS |
NZ
159(19 ov)
|
| India beat New Zealand by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 130/7
|
VS |
MAS
128(19.5 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 2 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.