Paperless Branches in India: सर्व बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी केल्यानंतर सर्व बँकांच्या कामाच्या पद्धती बदलणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी (27 जुलै) ही सूचना दिली. रिझव्र्ह बँकेने 'क्लायमेट रिस्क अँड सस्टेनेबल फायनान्स' या विषयावरील चर्चापत्रात म्हटले आहे की, हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींवर आधारित धोरण तयार करायचे आहे. यासाठी केंद्रीय बँक जागतिक संस्था आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांच्या अनुभवाचा फायदा घेत आहे. सर्व रिझव्र्ह बँक विनियमित घटकांसाठी (आरई) सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील.
शाखांना ग्रीन ब्रँच रूपांतरित करण्याचा विचार
हवामान बदलाच्या जोखमीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी रणनीती तयार करण्यात येईल, असे चर्चापत्रात सांगण्यात आले. "आरई बँकिंग प्रक्रिया अधिक पर्यावरणपूरक बनवून त्यांच्या कामकाजात कागदाचा वापर बंद करून बँकांचे ब्रँचेस ग्रीन ब्रँचमध्ये रूपांतरित करण्याचा विचार करू शकते," असे त्यात म्हटले आहे.
मात्र, हा बदल करणे बँकांना सोपे जाणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वाधिक समस्या ग्रामीण भागातील शाखेत येणार आहे.
आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत चर्चापत्रावरील प्रतिक्रीया मागवल्या आहेत. त्यानुसार, REs ई-पावत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्ग आणि माध्यमांचा विचार करू शकतात. इंडियन बँक्स असोसिएशन (RBA) शाश्वत वित्त क्षेत्रात हवामानातील जोखीम आणि क्षमता निर्माण करण्यावर एक कार्य गट स्थापन करू शकते, असेही सुचवण्यात आले.