पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून होणार सुटका; क्रेंद्र सरकारचा मोठा निर्णय

  पेट्रोलच्या सतत वाढत्या किंमतींवर एक पर्यायी उपाय 

Updated: Jun 21, 2021, 09:11 AM IST
पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून होणार सुटका; क्रेंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पेट्रोलच्या सतत वाढत्या किंमतींमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर सरकारचं नियंत्रण नसल्याचं वारंवार दिसून आलं. कारण पेट्रोल-डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारत निश्चित होतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर कोणत्याही प्रकारचा निर्णय सरकार घेवू शकत नाही. पण सरकारकडे  यावर एक पर्यायी उपाय आहे. पेट्रोलच्या जागी एक असं इंधन येईल ज्याचे दर फार कमी असतील. तर या इंधनाचं नाव आहे इथेनॉल (ethanol). 

येत्या 8 ते 10 दिवसांत केंद्र सरकार फ्लेक्स फ्यूल इंजिन (flex-fuel engines) वर मोठा निर्णय घेणार आहेत. ऑटोमोबाईल उद्योगासाठी अशी इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहेत. फ्लेक्स फ्यूल म्हणजे  Flexible Fue. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार या पर्यायी इंधनाची किंमत 60 ते 62 रूपये प्रति लिटर असणार आहे. 

आता पेट्रोलचे दर 103 रूपयांवर गेल्यामुळे इथेनॉल उत्तम इंधन असल्याचं सांगितलं जात आहे. इथेनॉल इंधनाचा वापर केल्यास पेट्रोल ग्राहकांचे 30 ते 35 रूपये वाचणार आहेत. नितीन गडकरी म्हणाले, 'मी परिवहन मंत्री आहे'  फक्त पेट्रोल इंजिन नाही तर फ्लेक्स-फ्यूल इंजिन तयार करण्याचे आदेश मी जारी केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांपुढे आता दोन पर्याय असणार आहेत. 

एक म्हणजे 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करू शकतात. किंवा 100 टक्के इथनॉलचा वापर करू शकतात. गडकरी पुढे  म्हणाले, 'ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेतील वाहन कंपन्या फ्लेक्स इंधन इंधन तयार करतात. या देशांमध्ये, ग्राहकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 10 टक्के बायो इथेनॉलचा पर्याय प्रदान केला जात आहे.'

नुकताचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, 'प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आयातीवर कमी आवलंबून राहण्यासाठी पेट्रोलसह 20 टक्के  इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले गेले होते, गेल्या वर्षी सरकारने 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.'