नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी घातपाताचा डाव उधळला, दोन दहशतवाद्यांना अटक

राजधानी नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी घातपाती कारवाया कऱण्याच्या तयारीत असलेल्या 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या दोन सदस्य अटक करण्यात आली आहे.

ANI | Updated: Jan 25, 2019, 10:35 PM IST
नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी घातपाताचा डाव उधळला, दोन दहशतवाद्यांना अटक title=

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी घातपाती कारवाया कऱण्याच्या तयारीत असलेल्या दोघांच्या दिल्ली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे दोघेही 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे. अब्दुल लतीफ गनी तथा उमैद दिलावर आणि हिलाल अहमद भट अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही जम्मू काश्मीरमध्ये वाकुरा आणि बाटापोराचे रहिवासी आहेत.

गणतंत्र दिवस : दिल्ली में सुरक्षा व्यवस्था कड़ी, 25,000 सुरक्षाकर्मी तैनात

दिल्लीतल्या लक्ष्मीनगर भागात संशयास्पद कृत्यांचा लष्करी गुप्तहेरांना सुगावा लागला होता. त्यानंतर केलेल्या कारवाईत दिलावरच्या मुसक्या आवळल्या. राजघाटाजवळ कोणाला तरी भेटण्यासाठी दिलावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

पॉईंट ३२ बोअरचे पिस्तुल आणि २६ जिवंत काडतुसं त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. तर भटने दिल्लीतल्या काही भागांची रेकी केली होती. त्याच्याही मुसक्या जम्मू काश्मीरच्या बांदिपोरा भागातून आवळण्यात आल्या. दरम्यान, नवी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत चोख बंदोबस्त करण्यात आला असून कडक पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीमध्ये सुमारे 25,000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले गेले आहेत. मध्य दिल्लीतील महत्त्वपूर्ण ठिकाणी सुरक्षा कडक केली गेली आहे. मध्य दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा अतिरेक्यांचा डाव होता. हे ठिकाण दहशतवाद्याच्या निशाण्यावर होते. दरम्यान, दोन दहशतवाद्यांकडून हल्ला करण्याचा डाव होता. मात्र, या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.