Celebration ला शॅम्पेन उडवत असाल तर वेळीच सावध व्हा; नाहीतर जीवावर बतेल!

New Year Celebration with Champagne: आता लवकरच नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. तेव्हा आपण सर्वचजण सेलिब्रेशनमध्ये व्यस्त राहू. सेलिब्रेशन म्हटलं की जंगी पार्टी ही आलीच. त्याचसोबत न्यू इयर सेलिब्रेशन म्हटलं की वाईन आणि शॅम्पेनसारख्या (champagne) गोष्टी या आल्याच. 

Updated: Dec 13, 2022, 09:50 PM IST
Celebration ला शॅम्पेन उडवत असाल तर वेळीच सावध व्हा; नाहीतर जीवावर बतेल!  title=
champagne new year celebration health effects

New Year Celebration with Champagne: आता लवकरच नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. तेव्हा आपण सर्वचजण सेलिब्रेशनमध्ये व्यस्त राहू. सेलिब्रेशन म्हटलं की जंगी पार्टी ही आलीच. त्याचसोबत न्यू इयर सेलिब्रेशन म्हटलं की वाईन आणि शॅम्पेनसारख्या (champagne) गोष्टी या आल्याच. परंतु शॅम्पेनसोबत सेलिब्रेशन करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं असं म्हटलं तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण हो, हे खरं आहे. तेव्हा आता जाणून घेऊया की शॅम्पेनसोबत सेलिब्रेशन करणं तुम्हाला का महागातस पडू शकतं. 

शॅम्पेन उघडताना थोडासा निष्काळजीपणा कार्यक्रमात उपस्थितांना इजा करू शकतो. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की जगभरात शॅम्पेन उडवाताना त्याच्याशी संबंधित अपघातांमुळे दरवर्षी 24 लोकांचा मृत्यू होतो. समोर आलेल्या माहितीनुसार (champagne harmful effects) हे आकडे नक्कीच खूप कमी आहेत परंतु अशी कृती करताना जोखीम मात्र फार जास्त आहे. कराण हे तुमच्याच्या धोकादायक आहे. असे अपघात फारच दुर्मिळ असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे परंतु सत्य हे आहे की शॅम्पेनच्या बाटलीतून बाहेर पडणाऱ्या कॉर्कचा दाब इतका वेगात असतो की त्यामुळे रक्तस्त्राव (blood Flow) होण्याची शक्यता असते किंवा डोळ्यांच्या बाहुल्यांनाही (eye ratina) इजा होऊ शकते. 

शॅम्पेन कॉर्क किती धोकादायक आहे हे समजून घ्या 

एका अभ्यासातून असे समोर आले आहे की शॅम्पेनच्या बाटलीमध्ये कॉर्कच्या (cork) खाली 90 psi पर्यंत दाब असतो. गाडीच्या टायरमध्ये भरलेल्या हवेपेक्षा हा दाब तिप्पट आहे. इतका की तो 42 फूट अंतरापर्यंत शॅम्पेन कॉर्क उडवू शकतो. समोर आलेल्या एका माहितीनूसार, शॅम्पेनमधून बाहेर पडणाऱ्या कॉर्कचा वेग ताशी 90-100 किमी पर्यंत असू शकतो. इतक्या स्पीडमधून बाहेर पडलेल्या कोणत्याही गोष्टीला तोंड द्यायला आपला चेहरा किंवा डोळे तयार नसतात हे उघड आहे. शॅम्पेन उडवणे म्हणजे एकप्रकारे मज्जा मस्ती म्हणून याकडे पाहिले जाते परंतु ही मज्जा जीवावरही बेतू शकते. शॅम्पेनमधला कॉर्क उघडल्यावर खूप वेगाने बाहेर पडतो आणि त्यासोबत भरपूर प्रमाणात द्रव बाहेर पडतं. शॅम्पेनची बाटली उघडताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे. असं करताना तुम्हाला भरपुर काळजी घ्यावी लागले. जर तुम्ही योग्य तंत्राचा वापर करून या बाटल्या उघडल्या तर तुम्ही सुरक्षित तर राहालच पण शॅम्पेनही कमी वाया जाईल. काही लोक चाकूने किंवा धारदार वस्तूने बाटली उघडण्याचाही प्रयत्न करतात. तेव्हा शॅम्पेनची बाटली फुटण्याचा धोका असतो. 

काय काय काळजी घ्याल? 

  • सर्व्ह करण्यापूर्वी शॅम्पेनची बाटली 8-10 अंश सेंटीग्रेडवर थंड करा. बॉटल थंड झाल्यावर त्याच्या आतला दाबही कमी होतो. त्यामुळे कॉर्क कमी प्रमाणात बाहेर येते. 
  • बॉटल जास्त हलवू नका तुम्ही जास्त हलवलीत तर जास्त दबाव निर्माण होईल. बाटलीला टॉवेलने वरून धरून हलके वाकवा आणि जिथे कोणी उभे नसेल त्या दिशेने धरा. यामुळे दाब देखील थोडा कमी होतो. 
  • आता कॉर्कला टॉवेलने धरून ठेवा आणि कॉर्क सैल होईपर्यंत हळूहळू बाटली फिरवा. कॉर्क पूर्णपणे सैल झाल्यावर दाब बाहेर पडू नये म्हणून ते खाली दाबा. जेव्हा दाब पूर्णपणे सोडला जातो तेव्हाच शॅम्पेन सगळ्यांना ग्लासमधून सर्व्ह करा. 

(ही माहिती सामान्य ज्ञान आणि तज्ञांच्या माहितीवरून मिळाली आहे. ZEE 24 TAAS मद्यपानाचे समर्थन करत नाही.)