मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोट्समुळे येत्या काही वर्षांत जगभरातील कित्येक नोकर्या जातील अशी भिती वर्तविली जात आहे.
जगभरातील तज्ञांच्यामते काही दशकांनी सार्वजनिक वाहतूकीचा रोजगार पूर्णपणे नष्ट होणार आहे.
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोजेक्ट एअरसिमचा विस्तार करण्यास सुरवात केली आहे.
एअरसिमिम एक वास्तववादी वाटणारे वातावरण निर्माण करतो, ज्यामध्ये गाड्यांच्या सुरक्षिततेची चाचणी केली जाऊ शकते.
विशिष्ट वेळेसाठी चाचणी केल्यानंतर या गाड्या नेहमीच्या रस्त्यांवर आणल्या जाऊ शकतात. एअरसिमच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये, ड्रोनसोबत कारही अपडेट पाहायला मिळणार आहे.
एअर सिम गाड्यांना शहराच्या ट्रॅफिकची माहिती देत असते. येणाऱ्या काळात बदलत्या हवामानाची माहिती देखील यामध्ये समाविष्ट केले जाईल. आपल्या विचाराच्या कित्येक पटीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स बदलत आहे.
२० वर्षांपूर्वी, मोबाईल फोन आणि जीपीएस सिस्टिम अस काही प्रत्यक्षात असेल असे वाटत नव्हते. पण बघता बघता लॅण्डलाईन फोन देखील इतिहासजमा झाला आहे.
बिना ड्रायव्हरची गाडी, ट्रेन ही खूपच दूरची गोष्ट असे आज आपल्याला वाटू शकेल. पण आज आपण ओला, उबेरने टॅक्सी बुक करतो तेव्हा बिना ड्रायव्हर, एजंटशिवायही गाडी समोर आलेली असते. या टॅक्सीमध्ये भाड्यापासून ते गंतव्य स्थानापर्यंत सर्वकाही माणसांनी ठरवलेले नसते.
व्यवहारही रोख होत नाहीत. म्हणून जर २० वर्षांनंतर आमच्या जमान्यात कार ड्रायवर चालवायचे अशा गोष्टी कोणी सांगितल्या तर वेगळ वाटणार नाही.