कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरांच्या मदतीला रोबोट

डॉक्टरांचा मदतनीस म्हणून रोबोट काम करू शकणार 

Updated: Apr 8, 2020, 04:03 PM IST
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरांच्या मदतीला रोबोट title=

नवी दिल्ली : कोरोना सारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी जगभरात संशोधन सुरु आहे. पण संशोधकांना यामध्ये अपेक्षित यश आले नाही. कोरोनावर मात करणारी लस सध्या शोधली जात आहेत. पण सध्या कोरोनाचा फैलाव जोरात होत आहे. यामुळे मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्यांच्या संपर्कात येऊन कोरोना होणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे. पण डॉक्टरांकडे याशिवाय पर्याय नसतो. हे पाहता एक नवी शक्कल लढवण्यात आली आहे. डॉक्टरांचा मदतनीस म्हणून रोबोट काम करू शकणार आहे.

यासंदर्भात छत्तीसगडमधील योगेश साहू यांनी रोबोट तयार केलाय. हा बनवण्यासाठी केवळ ५ हजार रूपये खर्च आला आहे. रोबोट इंटरनेटवर चालणार असून रोबोटमध्ये कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्या मार्फत डॉक्टर रुग्णाला तपासू शकतात. तसेच औषधे पण देऊ शकतात. कोरोना सारखा संसर्गापासून बचावासाठी अशा प्रकरचा रोबोट तयार करण्यात आला आहे. यामुळे कोरोना रुग्णांना हाताळणे डॉक्टरांसाठी सोपे होणार आहे.

लस शोधल्याचा दावा 

देशातील बड्या फार्मा कंपनीत गणली जाणारी कॅडिला हेल्थकेअरचे चेअरमन पंकज पटेल यांनी कोरोना व्हायरसवर औषध शोधून काढल्याचा, तसेच लस देखील लवकरच काही चाचण्यांनंतर आणू असा दावा केला आहे.

मात्र त्यांनी असं म्हटलं आहे की, अजून प्राण्यांवर ही चाचणी सुरू आहे. यात काटेकोर यश मिळाल्यानंतर पुढील ३ महिन्यात सरकारने परवानगी दिल्यानंतर बाजारात आणण्याचा कंपनीचा विचार असल्याचं पंकज पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच यात नक्कीच आपल्याला यश मिळेल असा दावा देखील त्यांनी केला आहे.