Changes From 1st August: ऑगस्ट महिना जवळ आला असून, 1 ऑगस्टपासून तुमच्या खिशावर परिणाम करणारे कोणते बदल होणार आहेत हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. यामध्ये एलपीजी गॅसची किंमत, बँकिंग चेकबुक आणि बँक सुट्ट्यांशी संबंधित काही अपडेट समाविष्ट आहेत. नव्या नियमांचा फटका थेट तुमच्या खिशाला बसणार आहे. याशिवाय बँकांनाही दर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात जास्त सुट्ट्या असतील. 1 ऑगस्टपासून होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेऊया.
स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती
1 ऑगस्टपासून गॅस सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करू शकतात. यावेळी एका सिलिंडरच्या दरात 20 ते 30 रुपयांनी बदल होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वेळी व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला होता, तर घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी वाढला होता.
बँक ऑफ बडोदा चेक पेमेंट सिस्टम
तुमचे खाते बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये असल्यास लक्षात घ्या की, 1 ऑगस्टपासून बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये धनादेशाद्वारे पैसे भरण्याचे नियम बदलणार आहेत. RBI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना कळवले आहे की, 1 ऑगस्टपासून, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशांसाठी 'पॉजिटिव पे' प्रणाली लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत बँकेला धनादेशाशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे द्यावी लागेल.
पॉजिटिव पे प्रणाली लागू
बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी RBI ने 2020 मध्ये धनादेशांसाठी 'पॉझिटिव्ह पे सिस्टम' सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रणालीद्वारे चेकद्वारे 5,00,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्यासाठी काही महत्त्वाच्या तपशीलांची आवश्यकता असू शकते.
या प्रणालीद्वारे चेकचे तपशील मेसेजिंग, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे दिले जाऊ शकतात. धनादेश भरण्यापूर्वी हे तपशील तपासले जातात.
बँका 10 दिवस बंद राहतील
यावेळी ऑगस्टमध्ये मोहरम (Muharram), स्वातंत्र्यदिन (Independence Day), पारसी नववर्ष, गणेश चतुर्थी असे अनेक सण येत आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात 10 दिवस बँका बंद राहणार आहेत.