नवी दिल्ली : लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. या संघर्षात भारताला एक महत्वाची साथ लाभली आहे ती म्हणजे रशियाची. सूत्रांच्या माहितीनुसार, रशियाने चीन बरोबरच्या संघर्षात भारताच्या प्रयत्नांना समर्थन देण्याचं आश्वासन दिलं आहे. रशियाने म्हटलं आहे की भारत आणि चीन दोन्ही देश त्यांचे जवळचे भागीदार आणि मित्र आहेत.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सग्रेई लावरोव यांनी बुधवारी सांगितलं की, भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुदाशेव आणि रशियाचे उपप्रमुख मिशन रोमन बाबूसकिन यांनी भारत-चीन सीमा संघर्ष संपुष्टात येईल अशी आशा व्यक्त केली आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय की, जसं की आपल्याला पहिल्यापासूनच जाणतो की भारत आणि चीन यांच्या सैन्य प्रतिनिधींमध्ये संपर्क आहे आणि ते परिस्थितीबाबत चर्चाही करत आहेत. वाद संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजनांवरही चर्चा करत आहेत. आम्ही या प्रयत्नांचे स्वागत करत आहोत.
राजदूत कुदाशेव यांनी ट्वीटद्वारे म्हटलंय की, आम्ही एलएसीवर डी-एक्सेलेशन करण्याच्या उद्देशाने सर्व प्रयत्नांचे स्वागत करत आहोत. ज्यामध्ये दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेली चर्चाही महत्वाची आहे आणि आम्ही आशावादी आहोत. तर रशियाचे उपप्रमुख मिशन (DCM) रोमन बाबूसकिन यांनी म्हटलंय की, आम्हाला आशा आहे की तणाव लवकरच संपुष्टात येईल आणि दोन्ही पक्ष सहकार्याची भूमिका घेऊन एक रचनात्मक संवादही सुरु ठेवतील.
भारत आणि रशिया यांच्यात नेहमीच मैत्रिपूर्ण संबंध राहिले आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या समर्थनासाठी नेहमीच उभे राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यावर्षी परस्परांशी अनेकदा चर्चा केली आहे, ज्यात कोरोना व्हायरस हा महत्वाचा मुद्दा राहिला होता.