'भारतात येईन तर बिबट्या आणि जाग्वारसोबतच नाहीतर...'

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धसंघर्ष सुरू आहे. गेल्या 13 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. युक्रेनमधून भारतीय लोकांना भारतात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षितपणे आणलं जात आहे. 

Updated: Mar 8, 2022, 07:19 PM IST
'भारतात येईन तर बिबट्या आणि जाग्वारसोबतच नाहीतर...' title=

कीव्ह : रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धसंघर्ष सुरू आहे. गेल्या 13 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. युक्रेनमधून भारतीय लोकांना भारतात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षितपणे आणलं जात आहे. 

काही तरुण मात्र आपल्या पाळीव प्राण्यांसाठी अडून राहिले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत कुत्रा आणि मांजरीचंही रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. युक्रेनमधील भारतीय तरुणाकडे बिबट्या आणि जाग्वार आहे. मात्र या दोघांना सोडून तो भारतात येणार नाही या हट्टालाच जणू तो पेटला आहे. 

एका आठवड्यापेक्षा जास्त काळ एक भारतीय डॉक्टर त्यांच्या युक्रेनमधील घराच्या तळघरात त्याच्या पाळीव बिबट्या आणि जग्वारसह आपला जीव मुठीत घेऊन राहात आहे. 

गिरीकुमार पाटील यांनी 20 महिन्यांपूर्वी कीव्ह प्राणीसंग्रहालयातून ह्या दोन प्राण्यांना विकत आणलं होतं. 'बिबट्या आणि जग्वारला सोबत घेतल्याशिवाय घर सोडणार नाही असं त्याने सांगितलं आहे.सहा वर्षांहून अधिक काळ रावरोडोनेत्स्कमध्ये राहत आहे. हे पूर्व युक्रेनमधील दोनबास प्रदेशातील एक लहान शहर आहे.

डॉ. गिरीकुमार सकाळी तळघरातून बाहेर पडतात. कर्फ्यू उठवल्यावरच त्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी अन्न विकत घ्यावं लागत आहे. प्राण्यांचं खाणंही या युद्धाच्या भीतीनं कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्राण्यांबाबत काय निर्णय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.