रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार

रशिया-युक्रेन युद्धाचे भारतासह जगाला भोगावे लागणार वाईट परिणाम, पाहा कोणत्या गोष्टी होणार महाग

Updated: Feb 28, 2022, 09:41 PM IST
रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार title=

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धसंघर्ष अजूनही संपला नाही. पाचव्या दिवशीही तणावाची स्थिती आहे. आता युक्रेन आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे. या वाटाघाटी यशस्वी होणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर आणि विशेष म्हणजे भारतावर कसा होणार जाणून घेऊया.

रशिया-युक्रेन युद्ध भडकल्याचे अत्यंत वाईट परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. काय असतील हे परिणाम आणि काय काय महाग होणार आहे जाणून घेऊया.

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या मालाच्या आयातीत अडथळे निर्माण झाले आहेत. सळईचे भाव चारच दिवसांत टनाला 5 हजारांनी महागले. स्टीलचे भाव वाढल्यानं घर बांधकामाचा खर्चही वाढणार 

युक्रेनमधून युरोपला मोठ्या प्रमाणावर  आयर्न, मॅगनीजचा पुरवठा युद्धामुळे कच्च्या मालाची साखळी तुटली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोलादचे दर टनाला 65 हजारांवर पोहोचले आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये तलबियाचं मोठं उत्पादन होतं. युद्धामुळे तेलबियाच्या आवकवर परिणाम होणार आहे. खाद्य तेल तब्बल 25 रुपयांनी महागलं आहे. 

2014 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे दर 102 डॉलर प्रतिडॉलरवर पोहोचले आहेत. यूपीचं मतदान आटोपल्यानंतर 7 मार्चला पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? रशियातून जगाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. सीएनजी, पीएनजीचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

फ्रिज, एसीसह इलेक्ट्रिक उपकरणं महाग होणार आहे. स्टील, प्लास्टिकसह कच्चा माल महागल्यानं इलेक्ट्रिक उपकरणं महाग झालं आहे.