पदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांंची पहिली प्रतिक्रिया

सचिन पायलट यांनी ट्विटवर माहिती ही बदलली.

Updated: Jul 14, 2020, 03:15 PM IST
पदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांंची पहिली प्रतिक्रिया title=

जयपूर : उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ट्विट करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सचिन पायलट यांनी ट्विट केले की, सत्य परेशान होऊ शकतं पण पराभूत नाही. यासह सचिन पायलट यांनी आपल्या ट्विटर बायोमधून उपमुख्यमंत्री काढून टाकले असून काँग्रेसचा ही कुठेही उल्लेख नाही.

गेहलोत सरकारने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून काढून टाकले आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना राजस्थान प्रदेशाध्यक्ष पदावरून ही काढले आहे. सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक विश्वेन्द्र सिंह आणि रमेश मीना यांनाही मंत्रीपदावरुन हटवण्यात आलं आहे.

सचिन पायलट गटातील आमदारांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत सन्मानाची हमी मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही आणि नेतृत्व बदलल्याशिवाय मान परत मिळणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पायलट गटाने हाय कमांडला निरोप पाठविला आहे की, अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकल्यानंतरच विचार केला जाईल.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, 'सचिन पायलट गोंधळात सापडले आणि भाजपच्या सापळ्यात अडकले. त्यांनी काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. गेल्या 72 तासांपासून काँग्रेस हाय कमांडने पायलट व इतर नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने सचिन पायलट यांना समजवण्याचा सतत प्रयत्न केला, पण त्यांनी सातत्याने सर्व काही नाकारले.'