Sahara: अमित शहांकडून सहारा रिफंड पोर्टल लॉंच, 10 कोटी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी

Sahara Refund Portal: या पोर्टलद्वारे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक परिपक्वता पूर्ण झाली आहे त्यांना रक्कम परत केली जाईल

Pravin Dabholkar | Updated: Jul 18, 2023, 12:35 PM IST
Sahara: अमित शहांकडून सहारा रिफंड पोर्टल लॉंच, 10 कोटी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी title=

Sahara Refund Portal: देशातील 10 कोटी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. या गुंतवणूकदारांना त्यांचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अमित शहांनी यासंदर्भात सुरू पोर्टल सुरु केले आहे. त्यामाध्यमातून सहारामध्ये जमा केलेले पैसे परत मिळणार आहेत. याची प्रक्रिया जाणून घेऊया.

सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या 10 कोटी गुंतवणूकदारांना आज मोठी बातमी मिळाली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवार,18 जुलै रोजी सहारा रिफंड पोर्टल सुरू केले आहे. 

या पोर्टलद्वारे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक परिपक्वता पूर्ण झाली आहे त्यांना रक्कम परत केली जाईल. गुंतवणुकीच्या पैशाच्या परताव्याशी संबंधित सर्व माहिती रिफंड पोर्टलवर उपलब्ध असेल, अशी माहिती देण्यात आलीा आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही कारवाई होताना दिसत आहे. सहारा इंडियामध्ये देशभरातील लाखो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये अडकले आहेत. लोक त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याची वाट पाहत आहेत. सहारा इंडियामधील गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही लोकांना त्यांचे पैसे परत मिळत नव्हते.