पगार, पेन्शन आणि EMI चे नियम 1 ऑगस्टपासून बदलणार...RBI कडून लोकांना मोठा फायदा

जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत धोरण आढावा घेताना या Nach प्रणालीसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.

Updated: Jul 24, 2021, 06:38 PM IST
पगार, पेन्शन आणि EMI चे नियम 1 ऑगस्टपासून बदलणार...RBI कडून लोकांना मोठा फायदा

मुंबई : आता पगार, पेन्शन किंवा ईएमआयबाबत सामान्य लोकांची मोठी समस्या दूर होणार आहे. यापूर्वी लोकं त्यांचा पगाराच्या किंवा पेन्शन येम्याच्या दिवशी विचार करायचे की,  त्या दिवशी बँकेची सुट्टी असू नये किंवा बँका बंद असू नये. योगायोगाने, बँकेची सुट्टी आणि शनिवार, रविवार एकत्र आला, तर पगारासाठी 3 दिवस वाट पाहावी लागते. परंतु आता असे होणार नाही. कारण कामकाजाच्या दिवसाव्यतिरिक्त देखील (working day) पगार, पेन्शन आणि ईएमआयचे काही काम असेल तर ते करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) यासाठी राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊस (NACH) चे नियम बदलले आहेत.

त्यामुळे आता लोकांना पगारासाठी कामाच्या दिवसाची म्हणजेच  working dayची प्रतीक्षा करण्याची गरज लागत नाही. आता ही सुविधा आठवड्यातून सातही दिवस उपलब्ध असणार आहे. सध्या ही सेवा बँका उघड्या असताना सोमवार ते शुक्रवारपर्यंत उपलब्ध आहे.

जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत धोरण आढावा घेताना या Nach प्रणालीसाठी नवीन नियम जाहीर केले. त्यांनी सांगितले होते की, रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) अंतर्गत ग्राहकांना चोवीस तास, सातही दिवस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आठवड्यातील सर्व दिवस Nach  सुरू ठेवण्यात येईल.

सध्या ही यंत्रणा फक्त बँकांच्या कामकाजाच्या दिवसांवर म्हणजेच सोमवार ते शनिवारपर्यंत कार्य करते. Nach चा नवीन नियम 1 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल.

याचा काय परिणाम होईल?

नाच ही एक बल्क पेमेंट सिस्टम आहे. ज्यात बर्‍याच लोकांना एकाच वेळी पगार किंवा पेन्शन दिली जाते. ही प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चालवते. सरकारी संस्था NPCI अनेक प्रकारचे पत हस्तांतरण देखील करते.

लाभांश, व्याज, पगार आणि पेन्शनची कामे देखील ती करते. या व्यतिरिक्त, वीज बिल, गॅस बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, कर्ज ईएमआय, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक, विमा, विमा प्रीमियम भरणे यासारख्ये कामेही Nach अंतर्गत येतात. आत्तापर्यंत ही सर्व कामे फक्त बँकांच्या कामकाजाच्या दिवशी (working day) करण्यात येत आहेत. परंतु आता ही सर्व कामे आठवड्याच्या शेवटी किंवा शनिवार-रविवार असला तरीही करता येतील. यामुळे लोकांना फायदा होईल.

दररोज व्यवहार शक्य

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या रूपात NACH हा एक महत्त्वपूर्ण डिजिटल मोड म्हणून उदयास आला आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. याअंतर्गत आता लोकं काही तासांचे काम अगदी काही सेकंदात करतात.

पूर्वी जे काम बँकेच्या शाखा किंवा सरकारी कार्यालयात जाऊन करायला लागायचे, परंतु तेच काम आता घरी बसून चुटकीसरशी केले जातात. यासाठी आपल्याला मोबाइल फोन किंवा आपला कंप्यूटरची गरज लागेल. आता मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे मोठी कामे सहज केली जातात.

त्याचप्रमाणे डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित करण्यासाठी NACH  सर्वात शक्तिशाली माध्यम म्हणून उदयास आले आहे. येथे बटण दाबा आणि लाखो लोकांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करा.

कोरोना काळात सरकारने याचीच मदत घेतली आहे. यावरुनच सरकारने  शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे पाठवले होते.

ECS पेक्षा Nach वेगळे आहे

पगार देण्याचे काम हे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टमद्वारे (ECS ) केले जाते. परंतु आता Nach त्याच्या जागी कार्य करेल. Nach हा एक प्रकारे ECSचा प्रगत प्रकार किंवा तंत्रज्ञान आहे. Nach हे ECSपेक्षा जलद आणि सादरीकरणासह देय देण्यास सक्षम आहे. Nach डेबिट आणि Nach क्रेडिट एकत्र काम करतील. डेबिटचा उपयोग बिल देयकासाठी केला जाईल, तर क्रेडिटचा वापर पगार, लाभांश आणि व्याज वितरणासाठी केला जाईल.